Social Phobia Symptom Treatment: तुम्हालाही गर्दी,कार्यक्रमात जायला लाज वाटते? असू शकतो 'हा' आजार

सोशल फोबिया जास्त प्रमाणात वाढला तर व्यक्तीला चार लोकांच्या मध्ये जाण्याची भीती वाटते.
Social Phobia Symptom Treatment:
Social Phobia Symptom Treatment: Dainik Gomantak
Published on
Updated on

Social Phobia Symptom Treatment: तुम्हाला जर कोणत्याही कार्यक्रमात किंवा गर्दीच्या ठिकाणी जायला लाज वाचत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ही बाब चितांजनक असू शकते. याला सोशल फोबिया असेही म्हाणतात. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. ज्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात किंवा चार लोकांमध्ये जायला लाज वाटते. चला तर मग जाणून घेऊया याची लक्षणे आणि उपाय कोणते आहेत.

  • सोशल फोबिया म्हणजे काय?

सोशल अ‍ॅन्झायटी डिसऑर्डर म्हणून ओळखला जाणारा सोशल फोबिया ही एक सामान्य समस्या आहे. हा फोबिया प्रत्येकामध्ये असतो. यामुळे अनेक लोक ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना लोक घाबरतात. इंटरव्ह्यूला जाताना अस्वस्थता सहसा लोक सामाजिक परिस्थितीत चिंताग्रस्त होणे, परंतु जर ही अस्वस्थता दीर्घकाळ टिकून राहिली आणि जीवनावर वाईट परिणाम होत असेल, तर ते सोशल फोबियाचे लक्षण मानले जाते. 

जेव्हा हा फोबिया जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा व्यक्ती चार लोकांच्या मध्ये जाण्याला देखील घाबरतो. अशा लोकांना असे वाटते की ते चार लोकांमध्ये गेले तर लोक त्यांचा अपमान करतील.

अशा व्यक्तीला असे वाटते की ते जज करतील.  सोशल फोबियामुळे, व्यक्ती कोणत्याही लोकांना भेटण्यास घाबरते. कोणाशीही बोलायला लाज वाटते.

सोशल फोबियाची लक्षणे?

  • सार्वजनिक ठिकाणी जायला भीती वाटते.

  • सार्वजनिक बोलण्याची भीती

  • मुलाखतीला गेल्यावर भीती वाटते

  • प्रेझेंटेशन देण्याबद्दल चिंता

  • आकर्षणाचे केंद्र बनण्याची भीती

  • सार्वजनिक ठिकाणी खाण्याची भीती

  • स्वतःला चार लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याची धडपड

  • अपमानाची भीती

  • बोलत असताना थरथरणे

  • चार लोकांमध्ये बोलताना घाम येणे

  • हृदयाचा ठोके वाढणे

Social Phobia Symptom Treatment:
Harmful Effects Of Using Lipsticks: सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावताय? मग 'ही' घ्या काळजी

सोशल फोबियाची कोणती कारणे?

  • ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. जर पालकांपैकी एकाला ही समस्या असेल तर मुलांमध्येही सोशल फोबिया होण्याची शक्यता असते.

  • आघात किंवा कोणतीही वाईट घटना ज्यामुळे लोकांशी बोलण्याची भीती वाटणे.

  • मुलांवर पालकांचे जास्त नियंत्रण हे देखील या आजाराचे कारण असू शकते.

सोशल फोबियावर उपचार

सोशल फोबियाच्या उपचारासाठी डॉक्टर अनेक प्रकारची औषधे किंवा थेरपी देतात. यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी दिली जाते. याशिवाय योगासने आणि ध्यानधारणा या आजारात खूप उपयुक्त ठरू शकतात. समुपदेशकाच्या मदतीने या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com