Banarasi saree Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Banarasi Silk Saree: फक्त 10 हजार रुपयांना घेतलेली तुमची बनारसी साडी 'नक्की सिल्कची आहे ना'?

Tips to Check Banarasi Silk : विचार करा तुम्ही एखादे दिवशी सिल्कची साडी विकत घेतली आणि ती नकली निघाली तर?

Akshata Chhatre

Tips to Identify Authentic Silk Saree

तुम्हाला साड्या भरपूर आवडतात का? असं अनेकवेळा होतं की एखाद्या साडीचा रंग किंवा टेक्श्चर आपल्या डोळ्यांमध्ये लगेच भरतो आणि साडीची किंमत न बघता आपण ती विकत देखील घेतो. काही लोकं अशीही असतात ज्यांना साड्यांचा भरपूर शौक असतो आणि किंमत न बघता साडी विकत घेतली जाते.

लग्न-मुंज किंवा फार-फार तर पार्टीच्या वेळी साडी विकत घेतली जाते पण विचार करा तुम्ही एखादे दिवशी सिल्कची साडी विकत घेतली आणि ती नकली निघाली तर?

पैसे वाया गेल्याचं दुःख असेलच पण सोबतच साडी नकली निघाल्याचा अधिक त्रास होईल. बनारसी स्लिक साड्या जगप्रसिद्ध आहेत. अत्यंत मऊ, हलक्या आणि उबदार साड्या प्रत्येकालाच हव्या हव्याशा वाटतात.

या साड्यांना मिळणाऱ्यामिळणाऱ्या पसंतीचा काही लोकं फसवगिरीमध्ये उपयोग करून घेतात. काही दुकानदार असेही आहेत जे खोट्या साड्या सिल्क साड्या म्हणून भरगोस किमतीला विकतात, मग तुम्ही कसं ओळखलं की तुम्हाला मिळालेली साडी सिल्कची आहे की नाही?

खरी सिल्की साडी कशी ओळखाल?

अस्सल बनारसी साडीचे विणकाम नेहमी आडव्या दिशेने केले जाते, त्यामुळे कधीही तुम्हाला याचं विणकाम उभ्या दिशेने केलेलं दिसणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बनारसी साडी तयार करताना कडा घट्ट ठेवण्यासाठी खिळ्यांचा वापर केला जातो आणि म्हणूनच एखादी साडी विकत घेताना साडीच्या काठावर असलेल्या पिनचं चिन्ह नक्की पहा.

साडी जर का खोटी असेल तर एखादा धागा जाणवून पाहिल्यानंतर हाताला चिकटेल, खरी सिल्कची साडी ही रेशमाच्या अळीच्या तंतूपासून धागा तयार करून बनवली जाते जिचा धागा जळवून बघितल्यास थेट राख होईल.

सिल्क साडीची किंमत किमान १० हजार तरी नक्कीच असते त्यामुळे एखादी साडी यापेक्षा कमी किमतीला मिळतेय म्हणून विकत घ्यायला गेलात तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. बनारसी सिल्क साडी हाताने विणलेली असते, त्यामुळे या साडीचा धागा काहीसा सैल असतो आणि दुसऱ्या बाजूला मशीनवर विणलेल्या साडीचा धागा पटकन ओळखता येतो. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ओळखीच्या दुकानदाराकडूनच अशा महाग साड्या विकत घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT