how to check ripe fruits: अनेकवेळा आपण बाराजात फळ आणि भाज्या विकत घ्यायला जातो, अनेकवेळा त्या फळ-भाज्या एकतर खराब असतात किंवा त्यांना चव नसते. आता तुम्हाला वाटेल फळ कापून न बघता किंवा चाखून न बघता त्याची चव कशी ओळखावी? सध्या गरमीचा बराच उकाडा सुरु आहे आणि साहजिकपणे या काळात काहीतरी फळं खावी असं वाटू शकतं पण मग चांगली फळं कशी ओळखावी? चला जाणून घेऊया..
फळं विकत घेताना ती पिकलेली आणि चांगली आहेत की नाही हे ओळखण्यासाठी त्या फळाच्या देठाजवळ वास घेऊन बघा. देठाजवळ जरी हलका गोड वास आला तर समजून जा की ते फळ पिकलेलं आहे मात्र असं न झाल्यास ते फळ लगेचच खाली ठेऊन द्या.
कलिंगडांमध्ये विशेषकरून फळ पिकलेलं आहे की नाही हे ओळखण्याची खास टेक्निक असते, जर कलिंगडाची साल काहीशी दाट वाटत असेल तर कलिंगड नक्कीच घरी घेऊन जाऊ शकता. कलिंगडाच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे फळाच्या खालच्या बाजूला जर पिवळा ठिपका दिसत असेल तर ते फळ पिकलेलं आहे हे समजून जा.
आंबा पिकलेला आहे की नाही हा ओळखणं सगळ्यात सोपं आहे. आंबा जर का घट्ट लागत नसेल आणि गडद पिवळसर रंग येत असेल तर आंबा पिकलाय हे नक्की. आंबा पिकल्यानंतर त्याचा वास सगळीकडे पसरतो त्यामुळे इतर फळांप्रमाणे आंबा पिकलेला आहे की नाही हे तपासण्यात अधिक वेळ घालवावा लागत नाही.
पेरू मात्र यापेक्षा वेगळा आहे, पेरू विकत घेताना कायम हातात घेऊन वजन पहा, जो पेरू काहीसा वजनदार दिसेल तोच पिकलेला पेरू आहे हे लक्षात ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.