Sameer Amunekar
गोव्याचे काजू संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेले काजू खरेदीसाठी उत्तम पर्याय आहेत.
गोव्याची लोकल स्पेशलिटी म्हणजे काजू आणि नारळापासून बनलेली फेणी. फेणी ही गोव्याची पारंपरिक आणि ऐतिहासिक पेयसंस्कृती दर्शवणारी ड्रिंक आहे
गोव्याच्या बाजारात तुम्हाला पारंपरिक हस्तकला, कोरीवकाम केलेल्या वस्तू, नारळाच्या करवंटीपासून बनवलेले शोपीसेस आणि बरेच काही मिळेल.
गोव्याच्या बाजारात स्टायलिश समुद्री कपडे, हॅट्स, सनग्लासेस आणि कलरफुल बीच अॅक्सेसरीज मिळतात.
गोव्याच्या किनाऱ्यांवर आणि बाजारात सुंदर शंख आणि त्यापासून बनवलेल्या ज्वेलरी व शोपीसेस सहज मिळतात.
गोव्याच्या लोकल बाजारात मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार मिळतात, ज्यामुळे तुमच्या जेवणात गोव्याचा स्वाद येईल.
गोव्याच्या प्रसिद्ध बेकरींमधून बेबिंका, दोश, आणि सेर्रादुरा हे खास गोड पदार्थ ट्राय करायला विसरू नका.