coconut water tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coconut Water: पाणीदार नारळ हवाय, पण हे ओळखायचं कसं? या सोप्या टिप्स वापरून पाहा

coconut selection guide: नारळात पाणी आहे, कितपत आहे याचा अंदाज सहज बांधता येत नाही

Akshata Chhatre

how to choose coconut: सध्याचा वाढता उकाडा पाहता सतत काहीतरी पीत राहावं असं वाटतं आणि ते साहजिक आहे आणि गोव्यात तर अशावेळी बऱ्यापैकी नारळाचं पाणी उपयोगी पडतं. तुम्हाला माहितीये का नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी बरंच पौष्टिक आहे, पण नारळ हा इतर फळांसारखा नसतो. घट्ट असतो आणि म्हणूनच नारळात पाणी आहे, कितपत आहे याचा अंदाज सहज बांधता येत नाही. मात्र आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला असा एक उपाय सुचवणार आहोत जेणेकरून नारळात किती पाणी आहे हे तुम्ही सहज ओळखू शकाल.

नारळात किती पाणी आहे, कसं ओळखाल?

कच्च नारळ किंवा अडसरात २०० ते ४०० मिली. पाणी असतं नारळाचा आकार कसा आहे, तो नारळ किती जुना आहे अशा काही निकषांच्या आधारे नारळात किती पाणी आहे याचा अंदाज लावता येतो.

नारळात किती पाणी हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे कानाजवळ नारळ वाजवून बघणं, जर अधिक जोरात आवाज आला तर समजा पाणी आहे आणि आवाज नाहीच आला किंवा कमी यते असेल तर समजून जा की नारळात पाणी कमी आहे.

शिवाय नारळाचं वजन किती आहे यावरून सुद्धा नारळात पाणी आहे की नाही याचा अंदाज येतो. पाणी असलेला नारळ हा बऱ्यापैकी जड असतो आणि पाणी कमी असलेला नारळ हलका असतो. नारळाच्या वरच्या बाजूला एक गोलाकार असतो, ज्याला नारळाचा डोळा असं म्हणतात, नारळात जर का पाणी असेल तर हा डोळा ताजा असेल तर नारळात पाणी आहे हे समजून जा.

तुम्ही बाकी नारळांसोबत सुद्धा एका नारळाची तुलना करून पाहू शकता. ज्या नारळालाच अधिक जोरात आणि भारी आवाज येईल तो नारळ अधिक पाण्याने भरलेला असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT