Goa Coconut Market: गोवेकरांनो!! खोबऱ्याचं प्रेम महागलं; नारळाचं वजन खिशाला झेपेना

Coconut Price Hike in Goa: काही दिवसांपूर्वी २० आणि २५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ सध्या ५० रुपयांना विकला जातोय.
Coconut Price Hike| Coconut Price |Goa Coconut Price
Goa CoconutDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जेवण ज्याशिवाय अपूर्ण आहे असा नारळ सध्या एक-एक पायरी वर चढतोय. नारळाचे दर आकाशाला गवसणी घालत असल्याने स्थानिकांसाठी मोठं प्रश्नचिह्न निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी २० आणि २५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ सध्या ५० रुपयांना विकला जातोय. गोव्यात सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण काहीही म्हटलं की खोबरं महत्वाचा घटक ठरतो.

गोव्यात आकाराच्या हिशोबाने नारळाची किंमत ठरते. काही दिवसांपूर्वी राज्यात १५ ते २० रुपयांनी नारळाच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. मोठा नारळ ४५ ते ५० आणि लहान आकाराचा नारळ २५ रुपयांना तर माध्यम आकाराचा नारळ हा ३५ ते ४० रुपयांच्या किमतीला उपलब्ध व्हायचा.

Coconut Price Hike| Coconut Price |Goa Coconut Price
Coconut Market Goa: खोबऱ्याच्या बाबतीत करावी लागणार काटकसर; नारळाचे दर इतक्या रुपयांनी वाढले

मात्र आता यात आणखीन वाढ झाल्याने स्थानिकाकांसाठी अडचण निर्माण झालीये. पणजी बाजारात सध्या छोट्या आकाराचा नारळ ३० रुपये, मध्यम आकाराचा नारळ ४० तर मोठ्या आकाराचा नारळ ५० रुपयांना विकला जातोय.

राज्यात वाढलेला माकडांचा उपद्रव तसेच माडांच्या झाडांना ग्रासलेली रोगराई यामुळे नारळाचं उत्पन्न काम कमी झालं आहे.गोव्यात नारळ हा अतिशय महत्वाचा घटक असल्याने बाजारातील वाढत्या मागणीमुळे दर वाढत चाललाय. शिवाय राज्यात सध्या नारळ पडणाऱ्या पाडेलीचा खर्चही वाढला असल्याने बाजारात हवा तास पुरवठा होत नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

High Fish Rates In Goa
Goa Food Price Increase
Commercial LPG Price Hike
Air India Ticket Prices To Rise
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com