Prostate Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Prostate Cancer: सुरुवातीच्या टप्प्यात कसा ओळखायचा 'प्रोस्टेट कर्करोग', जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

Prostate Cancer Symptoms And Treatment: गेल्या काही वर्षांत भारतात प्रोस्टेट कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हा पुरुषांमध्ये होणारा एक सामान्य कर्करोग आहे, जो प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होतो.

Manish Jadhav

गेल्या काही वर्षांत भारतात प्रोस्टेट कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हा पुरुषांमध्ये होणारा एक सामान्य कर्करोग आहे, जो प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होतो. प्रोस्टेट कर्करोग बहुतेकदा वृद्ध लोकांमध्ये होतो. सुरुवातीला, प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे समजणे कठीण असते, परंतु जसजसा वेळ जातो तसतसे प्रोस्टेटची लक्षणे तीव्र होऊ लागतात. ज्यावर नियंत्रण मिळवणे कठिण होऊन जाते. यामुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. परंतु जर त्याची काही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातच समजली तर या असाध्य आजारावर उपचार शक्य आहेत आणि रुग्ण बरा होण्याची शक्यता जास्त आहे.

दरम्यान, प्रोस्टेट कर्करोग 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये होतो. तथापि, त्याच्या काही केसेस तरुणांमध्ये देखील दिसून आल्या आहेत. यामध्ये, रुग्णाला वारंवार लघवी लागते, लघवी करताना प्रचंड वेदना होतात, अधूनमधून लघवी होते आणि मूत्रमार्गात जळजळ आणि वेदना होतात. याशिवाय लघवीतून रक्त येणे, हाडांमध्ये वेदना होणे ही देखील प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे असू शकतात. जर कोणत्याही व्यक्तीला अशी लक्षणे दिसली तर त्याने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सुरुवातीलाच ही ब्लड चाचणी करुन घ्या

यासाठी, डिजिटल रेक्टल एक्झाम (DRE) चाचणी केली जाते. याद्वारे पीएसए पातळी कळते. जर पीएसए पातळी वाढली तर ती धोकादायक मानली जाते. डॉक्टर पुढील तपासणी करण्याचा सल्ला देतात. जर ही पातळी सामान्य असेल तर घाबरण्याची काही एक गरज नाही. प्रोस्टेट ग्रंथी योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर बायोप्सी करतात. याशिवाय, एमआरआय किंवा सीटी स्कॅनद्वारे प्रोस्टेट ग्रंथीची माहिती मिळू शकते.

स्वतःचे संरक्षण कसे करावे

निरोगी जीवनशैली जगणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे. तर धूम्रपान सोडावे. याशिवाय, मसालेदार पदार्थाचे सेवन टाळावे.

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी दर तीन महिन्यांनी PSA आणि DRE चाचणी करुन घ्यावी.

जर कुटुंबातील एखाद्याला कर्करोग झाला असेल तर वयाच्या 40व्या वर्षापासून चाचणी सुरु करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT