
जगभरात पन्नाशीच्या आतील व्यक्तींना कर्करोग होण्याचा धोका तीन दशकांत तब्बल 80 टक्क्यांनी वाढला आहे. बदलती जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि स्थूलता ही यामागे प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. याचदरम्यान, एक बातमी समोर आली आहे. आता एआय कर्करोगाचा शोध घेऊ शकते. होय, चकित झालात ना... एवढचं नाहीतर एआय कर्करोगाची लस विकसित करण्यास मदतही करु शकते. ही लस एआय 48 तासांत उपलब्ध करुन देऊ शकते, असा दावा ओरेकॉलचे अध्यक्ष लॅरी एलिसन यांनी केला आहे. व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात एलिसन बोलत होते. या कार्यक्रमात सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन आणि ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हेही उपस्थित होते.
एआयच्या माध्यमातून ब्लड चाचणी पाहून कर्करोगाचे तात्काळ निदान करु शकता. एकदा का तुम्ही ट्यूमरचे जीन सिक्वेन्स केले की, तुम्ही रुग्णाला लस देऊ शकता. विशेषत:हा प्रत्येक व्यक्तीसाठी लस (Vaccine) तयार करु शकता. एवढचं नाहीतर ती एमआरएनए लस तुम्ही रोबोटिक पद्धतीने पुन्हा एआयचा वापर करुन सुमारे 48 तासांत बनवू शकता, असे एलिसन यांनी पुढे बोलताना सांगितले.
दरम्यान, ओपनएआय, सॉफ्टबँक आणि ओरॅकल 'स्टारगेट' नावाचा एक संयुक्त प्रोजेक्ट सुरु करण्याची योजना आखत आहेत. जो अमेरिकेत (America) डेटा सेंटर्सची उभारणी करेल. याच्या माध्यमातून 1,00,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. या कंपन्यांनी स्टारगेटच्या इतर इक्विटी सपोर्टसह पुढील चार वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
एलिसन यांनी शेवटी सांगितले की, प्रोजेक्टमधील पहिल्या डेटा सेंटरचे काम आधीपासूनच टेक्सासमध्ये सुरु आहे. प्रत्येकी अर्धा दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेली तब्बल वीस डेटा सेंटर उभारण्यात येतील. हा प्रोजेक्ट एआयला सक्षम करु शकतो, जो इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदीचे विश्लेषणास मदत करेल. याशिवाय, डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांची काळजी घेण्यासही मदत करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.