Mental Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relief From Mental Illness: मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी 'या' गोष्टी करणे आवश्यक

Relief From Mental Illness: जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळाला, जवळची व्यक्तीचा मृत्यू झाला, अपघातात शरिराचे नुकसान झाले, नोकरीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण असेल, तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्ही समाधानी नसणे अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येते.

दैनिक गोमन्तक

Relief From Mental Illness: आजकालच्या व्यस्त आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या शारिरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो.

नैराश्य, मानसिक आजार या सगळयातून आत्महत्या असे अनेक प्रकार आपण आजूबाजूला पाहतो. अनेकांना हे देखील माहीत नसते आपण मानसिक आजाराचा सामना करत आहोत. अनेकांच्या बाबतीत मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुकता नसणे ही सगळयात मोठी अडचण ठरत असून अशा समस्यावर उत्तर शोधणे कठीण जात आहे.

मानसिक आजार म्हणजे नेमके काय?

मानसिक आजारी म्हणजे जसे आपले शरीर आजारी असल्यावर आपल्याला थकवा जाणवतो. इतर काही करावे वाटत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण मानसिकरित्या आजारी असतो तेव्हा आपण काय करत आहोत, काय वागत आहोत, काय बोलत आहोत याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपले आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि कृतींवर नियंत्रण नसते.

मानसिक आजाराची कारणे काय?

जर आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवू शकलो नाही, जसे की करिअरच्या बाबतीत हे अनेकदा घडते. याबरोबरच, जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळाला, जवळची व्यक्तीचा मृत्यू झाला, अपघातात शरिराचे नुकसान झाले, नोकरीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण असेल, तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्ही समाधानी नसणे अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येते.

याबरोबरच, लहानपणी झालेल्या काही प्रसंगाचा, घटनांचादेखील तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.

मानसिक स्वास्थ जपण्यासाठी काय करावे?

1. व्यायाम

तुमच्या मानसिक स्वास्थासाठी तुमची शारिरिक हालचाल असणे महत्वाचे ठरते. त्यासाठी तुम्ही धावणे, ट्रेकिंग करणे, चालणे, सायकलिंग करणे असे विविध व्यायामप्रकार तुम्ही करु शकता. यातून तुमचा ताणतणाव दूर होण्यास मदत होईल आणि तुम्ही नैराश्यापासून दूर राहाल.

2. आहार

तुमचा आहार तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव टाकत असतो. मोठ्या प्रमाणात प्रोसेस केलेले अन्न आणि साखर असलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या ताणतणावात वाढ होते.

त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, फळे, मासे, मांस, दूध, कडधान्ये याचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे.

3. फोनचा कमी वापर

मोबाइल, लॅपटॉप हे जरी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असेल आणि आपली गरज असेल तरीदेखील त्याचा जास्त प्रमाणात वापर आपल्या तणावात वाढ करु शकत असल्याचे अनेक संशोधनात समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्क्रीनचा वापर करणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे ठरते.

4. स्वत:ची काळजी घ्या

आपण अनेकदा इतरांची काळजी घेतो मात्र स्वत:ची काळजी घेणे विसरतो. जेव्हा मानसिक स्वास्थ्यासंबंधी समस्यांचा तुम्ही सामना करत असता तेव्हा तुम्ही स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे.

जसे की, घराच्या बाहेर जाऊन चालणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, व्यायाम करणे, योगासने करणे, झोपण्यापूर्वी स्ट्रेचिंग करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT