World Heart Day 2023: तुमचे हृदय निरोगी राहावे यासाठी 'ही' काळजी घ्या

World Heart Day 2023: सर्वानी आपल्या स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.
HEART
HEARTDainik Gomantak
Published on
Updated on

World Heart Day 2023: दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी यादिवशी जागरुकता निर्माण केली जाते.

जागतिक हृदय दिन 2000 साली वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी संयुक्तपणे सुरू केला.

हृदयाशी संबंधित आजारांकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना या प्राणघातक आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

दरवर्षी जागतिक हृदय दिन वेगळ्या थीमसह साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये, जागतिक हृदय दिनाची थीम 'Use heart, know heart is open-ended' अशी आहे.

ही थीम आपल्याला आठवण करून देते की सर्वानी आपल्या स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.

हा दिवस का साजरा केला जातो?

हृदय आपल्या शरिरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. हृदय विकार आणि हृदयविकाराचा झटका यामुळे अनेकजण आपला प्राण गमावतात.

दरवर्षी अंदाजे 18.6 मिलियन लोक हृदयविकारामुळे आपला जीव गमावतात.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य व्यायाम आणि योग्य आहाराच्या कमतरेतमुळे हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.

ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन न होणे हे देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी

१. दररोज १ तास व्यायाम करावा

२. फळे खावीत

३. तेलाचा कमी वापर करावा

४. मेडीटेशन करा

५. वेळीच ताणतणावाचे व्यवस्थापन करा

६. तुमच्या नात्यांना वेळ द्या, तुमच्या लोकांशी संवाद साधा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com