Kitchen Hacks | Plastic Tiffin Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: स्वच्छ करूनही मुलांच्या प्लास्टिक टिफिन बॉक्सला वास येतो? मग वापरा या सोप्या टिप्स

हल्ली जेवणासाठी प्लास्टिकचे डबे वापरले जातात

Kavya Powar

Plastic Tiffin Cleaning Tips: हल्ली जेवणासाठी प्लास्टिकचे डबे वापरले जातात. अनेक महिला आपल्या मुलाना शाळेत पाठवतानाही प्लॅस्टिकच्या डब्यातूनच जेवण देतात. पण काही दिवसांच्या वापरानंतर या जेवणाच्या डब्यावर डाग दिसू लागतात आणि डब्यातून वास येऊ लागतो.

डिटर्जंट किंवा डिशवॉशिंग साबण वापरुनही वास आणि डाग निघत नाही. अशा परिस्थितीत इथे काही सोप्या टिप्स जाणून घ्या ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमचा जेवणाचा डबा स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त करू शकाल.

बेकिंग सोडा: प्लास्टिकचे जेवणाचे डबे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात 3 चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. नंतर जेवणाचा डबा या पाण्यात बुडवून ठेवा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. नंतर तो बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. याने तुमचा प्लॅस्टिकचा डबा स्वच्छ आणि वासमुक्त होईल.

कॉफी: प्लास्टिकचा डबा वासमुक्त करण्यासाठी तुम्ही कॉफी देखील वापरू शकता. यासाठी जेवणाच्या डब्यात कॉफी पावडर टाकून थोडा वेळ डबा घासा आणि 15 मिनिटे असेच ठेवा. यानंतर डबा स्वच्छ पाण्याने धुतल्यास पूर्णपणे वासमुक्त होईल.

ब्लीच: तुम्ही जेवणाचा डबा ब्लीचच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी लिक्विड क्लोरीन ब्लीच पाण्यात मिसळा आणि जेवणाचा डबा त्यात बुडवून काही वेळ तसाच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

व्हिनेगर: व्हिनेगर वापरून, तुम्ही तुमचा प्लास्टिकचा जेवणाचा डबा काही मिनिटांत स्वच्छ आणि डागमुक्त करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि जेवणाच्या डब्यात टाका आणि काही वेळ राहू द्या. काही वेळाने ते लिक्विड डिटर्जंटने स्वच्छ करा. यामुळे जेवणाचा डबा पूर्णपणे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होईल.

मीठ आणि लिंबू: प्लास्टिकच्या जेवणातील डाग आणि वास दूर करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी 1 लिटर पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे मीठ घालून चांगले मिसळा. आता हे पाणी कोमट गरम करा, त्यानंतर जेवणाचा डबा या मिश्रणात टाका आणि साधारण 5 मिनिटे राहू द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याची हिरवाई नष्ट होतेय, त्याकडे लक्ष द्या! ३ विद्यार्थिनींनी अवैध बांधकामांविरुद्ध केले Reel; ‘इको थिंकर्स फेस्ट’ उपक्रम

Partgali Math: पर्तगाळीत रंगणार ‘नांदी दर्शन’ कार्यक्रम! तब्बल 575 कलाकारांचा सहभाग; गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा येणार अनुभव

Goa ZP Election: 'हे राजकारण मान्य नाही!' कुर्टी-फोंडा जागेवरून केतन भाटीकर आक्रमक; भाजपला थेट इशारा

Goa Forward: 'पोलिस आले, त्‍यांनी व्यासपीठावर जाऊन माईक बंद केला'! गावडोंगरीत अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्‍याचा गोवा फॉरवर्डचा दावा

Sangolda Casino: कॅसिनो कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत धिंगाणा! सोशल मीडियावर होताहेत आरोप; सांगोल्डा येथील Viral Video मुळे चर्चा

SCROLL FOR NEXT