Chicken Popcorn Recipe:
Chicken Popcorn Recipe: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chicken Popcorn Recipe: नॉनव्हेज प्रेमींनो घरीच झटपट तयार करा टेस्टी चिकन पॉपकॉर्न

दैनिक गोमन्तक

Chicken Popcorn Recipe: तुम्हालाही नॉनव्हेज खाण्याची आवड असेल तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करुन पाहा. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स मध्ये चटपटीत पदार्थ खायला अनेकांना आवडते.

नॉनव्हेज खाण्याची आवड असणारे लोक तर विविध पदार्थांच्या शोधतच असतात. चिकन पॉपकॉर्नची ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी असुन झटपट तयार होते. तुम्ही हे स्टार्टर म्हणून देखील सर्व्ह करु शकता.

  • चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- चिकन - 500 ग्रॅम

- कॉर्नफ्लोअर - 2 छोटे चमचे

- ब्रेड पावडर - 1/2 कप

- आले पेस्ट - 1/2 टीस्पून

- लिंबाचा रस - 1/2 टीस्पून

- लसूण पेस्ट - 1/2 टीस्पून

- लाल तिखट - 1/2 टीस्पून

- हळद - 1 टीस्पून

- गरम मसाला -1/2 टीस्पून

- तेल - 1 कप

- मीठ - चवीनुसार

  • चिकन पॉपकॉर्न बनवण्याची कृती

चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वात पहिले सर्व मसाले एका भांड्यात टाकावे आणि चांगले मिक्स करावे.

नतंर या मिश्रणात ब्रेड पावडर, कॉर्नफ्लोअर घालावे.

यानंतर चिकन पूर्णपणे स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करून या मिश्रणात मिक्स करावे.

नतंर एका कढईत तेल गरम करावे.

या मिश्रणात चिकन बुडवून ते तेलात टाकावे.

सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावे.

तुमचे चविष्ट चिकन पॉपकॉर्न तयार आहे.

तुम्ही तुमच्या आवडत्या सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

SCROLL FOR NEXT