Astrology Tips: घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी बाहेर ठेवावा

घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा हे जाणून घेउया.
Astrology Tips
Astrology TipsDainik Gomantak

Which Foot To Keep First Out Of The House: घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा याबाबत अनेक वाद होत असतात. पण आज शास्त्रनुसार घराबाहेर जाताना किंवा घरात येताना कोणता पाय आधी आत किंवा बाहेर टाकावा याची माहिती जाणून घेणार आहोत.

याचे खास कारण म्हणजे घरातून (Home) बाहेर पडताना चुकीचा पाय आधी बाहेर ठेवला तर नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही काही महत्त्वाच्या कामा किंवा शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर आधी कोणता पाय बाहेर ठेवायचा हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कामात अडथला योणार नाही.

  • घराबाहेर जाताना आधी कोणता पाय बाहेर ठेवावा

घराबाहेर जाताना उजवा पाय आधी बाहेर ठेवल्याने कामात यश मिळते. बहुतेकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की, घराबाहेर पडताना उजवा पाय पहिले बाहेर ठेवावा.

सामुद्रिक शास्त्रात असेही मानले जाते की, जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर सर्वात पहिले उजवा पाय घराबाहेर टाकावा. असे केल्याने सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतात आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.

Astrology Tips
Kidney Problem: 'हे' 3 लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब व्हायला सुरूवात झालीये
  • घरात प्रवेश करताना कोणता पाय आधी आत घ्यावा

घरात प्रवेश करताना उजवा पाय आधी घरात घेणे शुभ मानले जाते. समुद्री शास्त्रानुसार घरात लग्न होते तेव्हा वधू घरात प्रवेश करताना आधी उजवा पाय घरात ठेवते.

खर सांगायचे झाले तर ही फार जुनी परंपरा आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी निघण्यापूर्वी उजवा पाय पहिले घराबाहेर ठेवतात. असे केल्याने, तुम्ही ठरवलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळते.

यामागचे दुसरे एक शास्त्र असे आहे की, उजवा हात आणि डावा हात यातही पूजा करताना उजव्या हाताचा वापर केला जातो. त्याप्रमाणे, घराबाहेर जातानाही उजवा पाय घराबाहेर ठेवणे हे शुभ मानले गेले आहे. डावा पाय घराबाहेर ठेवणे याला शास्त्रात नकारात्मकतेचे लक्षण मानले गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com