Hot Chocolate Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hot Chocolate Recipe: घरीच 15 मिनिटांत तयार करा चविष्ट हॉट चॉकलेट, नोट करा रेसिपी

How To Make Hot Chocolate Know in Marathi: जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल हॉट चॉकलेटचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुढील रेसिपी फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Hot Chocolate Recipe in Marathi:

हिवाळ्यात चहा-कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त असतात. पण अलीकडच्या काळात हॉट चॉकलेट ड्रिंकची क्रझ वाढत आहे. चॉकलेट आणि दुधापासून बनवलेले हे घट्ट पेय थंडीत पिण्याची वेगळीच मज्जा असते. हिवाळ्यात यापेक्षा अधिक आरामदायी काहीही असू शकत नाही. तुम्हाला जर घरीच हॉट चॉकलेटचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुढील रेसिपी नोट करा.

  • हॉट चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

50 ग्रॅम - गोड चॉकलेट

2 - कप फुल क्रीम दूध

2 - चमचे साखर

1/2 - टीस्पून व्हॅनिला इसेन्स

2 - चमचे व्हीप्ड क्रीम

  • कृती

गोड चॉकलेट बनवण्यासाठी कमी गोड किंवा गडद चॉकलेट घ्यावे. सर्वात पहिले चॉकलेट किसून घ्या आणि एका भाड्यात ठेवावे.

यानंतर ते चांगले मिक्स करावे. कढईत दूध आणि साखर घालून गरम करावे. दुधावर मलई दिसायला लागल्यावर आग कमी करावी आणि 2 मिनिटे तसेच ठेवावे.

आता 2 चमचे गरम दूध घेऊन त्यात चॉकलेट टाकून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करावे. मिक्सरच्या मदतीने ते गुळगुळीत सुसंगततेसाठी तयार करावे.

एका भांड्यात वितळलेले चॉकलेट आणि व्हॅनिला इसेन्स दुधात घालून मिक्स करा. 

नंतर तुमचे तयार केलेले हॉट चॉकलेट सर्व्हिंग ग्लासमध्ये टाका आणि वर व्हीप्ड क्रीमने सजवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT