Chocolate Brownie Recipe: फक्त 5 मिनिटात तयार होईल 'चॉकलेट ब्राउनी', नोट करा रेसिपी

तुम्हाला गोड खाण्याचा मुड झाला असेल तर झटपट चॉकलेट ब्रॉउनी बनवू शकता.
Chocolate Brownie Recipe
Chocolate Brownie RecipeDainik Gomantak

easy recipe of chocolate brownie try home make weekend special

आपल्या सर्वांना गोड पदार्थ खायला आवडते. काहीजण घरी बनवतात तर काहीजण विकत आणून मिठाईचा आनंद घेतात. तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि झटपट तयार होणारा पदार्थ हवा असेल तर तुम्ही चॉकलेट ब्राउनी बनवू शकता.

वॉलनट ब्राउनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • वितळलेले चॉकलेट

  • दोन चमचे वितळलेले बटर

  • चवीनुसार बारिक केलेली साखर

  • एक वाटी मैदा

  • एक कप दूध

  • तीन ते चार बारीक चिरलेले अक्रोड

  • चोको चिप्स आवश्यकतेनुसार

  • व्हॅनिला आइस्क्रीम

  • अक्रोड ब्राउनी बनवण्याची पद्धत

चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी एका भांड्यात वितळलेले चॉकलेट घ्या आणि त्यात साखर, मैदा, दूध आणि बारीक चिरलेला अक्रोड घाला आणि चांगले मिक्स करा.

सर्व नीट मिक्स करा. त्यात गुठळ्या होऊ देऊ नका.

नंतर ब्राउनी बॅटर एका बेकिंग ट्रेमध्ये किंवा बटर पेपरने लावलेल्या भांड्यामध्ये पसरवा आणि वर चोको चिप्स टाका आणि बेक करा.

75 सेकंद ओव्हनमध्ये ब्राउनी ठेवा. ब्राउनी बेक झाल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा आणि त्यात व्हॅनिला आइस्क्रीम ठेवा.

चॉकलेट सिरप, चोको चिप्स आणि अक्रोड्सने सजवा आणि सर्व्ह करा.

  • कसे स्टोअर कराल

जर तुम्हाला ब्राउनी जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा विचार करत असाल तर हवाबंद डब्यात ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

एक ते दोन दिवस ठेवा, अधिक दिवसात खराब होईल.

  • चॉकलेट वॉलनट ब्राउनीज बनवतांना या गोष्टी ठेवा लक्षात

अक्रोड ब्राउनीमध्ये फक्त दोन चमचे बटर टाकावे.

अतिरिक्त चवसाठी ब्राउनीमध्ये ओरियो बिस्किटे किंवा ब्रेडचे तुकडे घालू शकता.

उत्तम बेकिंगसाठी तुम्ही अर्धा चिमूटभर इनो घालू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com