Home Remedies For Knee Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Knee Pain: गुडघेदुखीच्या वेदना 'या' 4 घरगुती उपायांनी होतात चुटकीसरशी दूर

परंतु दिर्घकाळापासून ही या समस्येचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता

Puja Bonkile

Home Remedies For Knee Pain: जगभरात वृद्धासह तरूणामध्ये देखील गुडघेदुखीची समस्या वाढत आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. चुकीची लाइफस्टाइल, पोषक घटकांचा अभाव, किंवा अपघात यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. परंतु दिर्घकाळापासून ही या समस्येचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल.

Ginger
  • आलं

आलं अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. आल्याचा वापर करून तुम्ही गुडघेदुखीच्या वेदना कमी करू शकता. तसेच सांधेदुखीच्या वेदनेवर देखील आलं फायदेशीर ठरतो. यासाठी कोमत पाण्यात आल्याचे छोटे तुकडे उकळावे आणि गाळून घ्यावे. नतंर त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस टाकून सेवन करावे. हे पाणी रोज प्यायल्याने गुडघेदुखीची समस्या कमी होईल.

Turmeric
  • हळद

हळद आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधीयुक्त गुणधर्म असतात. यामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. या गुणधर्मामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो. यासाठी गरजेनुसार एक चमचा हळद पावडर पाण्यात टाकून पेस्ट बनवावी आणि नंतर गुडघ्यांवर लावावी. असे दिवसातून दोनदा केल्यास गुडघेदुखीची समस्या कमी होईल.

Alovera
  • कोरफड

कोरफडचा वापर आरोग्यासह केस, त्वचेसाठी देखील केला जातो. कोरफडचा रस लावल्याने गुडघेदुखी आणि त्वचेची होणारी जळजळ कमी होऊ शकते. यासाठी कोरफड रसामध्ये हळद मिक्स करून गुडघ्यावर लावावे. यामुळे गुडघेदुखीची समस्या दूर होऊ शकते

Camphor oil
  • कापूर तेल

गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कापराच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा कापूर तेलमध्ये खोबरेल तेल मिक्स करावे आणि चांगले गरम करा. नंतर तेल थंड झाल्यावर दिवसातून दोनदा गुडघ्यांना मालिश करावी. यामुळे गुडघेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT