Home Made Scrub made from coconut and rose
Home Made Scrub made from coconut and rose Dainik Gomantak
लाइफस्टाइल

नितळ त्वचेसाठी नारळ आणि गुलाबापासून बनवा Home Made Scrub

दैनिक गोमन्तक

अनेक महिला त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय शोधत असतात. बेसन, हळद आणि दही याचे मिश्रण लावल्यास त्वचा उजळ होण्यास मदत मिळते. पण हे केवळ चेहऱ्यांसाठी (Face) उपयुक्त ठरते. पण हात आणि पायाची काळजी घेण्यासाठी तुम्ही नारळ आणि गुलाबजलपासून बनवलेले बॉडी स्क्रब (Body Scrub) वापरू शकता. यात कोणतेही रासायनिक घटक (Chemical component) नसल्याने आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. याचा वापर केल्यास आपल्याला फ्रेश वाटते. चला तर मग जाणून घेवूया 'कोकोनट रोझ शुगर स्क्रब' (Coconut Rose Sugar Scrub) चे फायदे आणि बनवण्याची पद्धत.

* स्क्रब बनवण्याची पद्धत

एक मोठ्या बाउलमध्ये साखर आणि नारळ घ्यावे. नंतर यात नारळ तेल टाकावे आणि चांगले मिक्स करावे. नंतर यात गुलाब जल टाकून एकजीव करावे. नंतर या मिश्रणात गुलाब एसेंशीयल ऑइल मिक्स करावे. तुम्हाला तेलाचा वायस आवडत नसेल तर फक्त 5 थेंब तेलाचे टाकावे.

* कसे वापरावे

तुम्ही हा स्क्रब हात आणि पायांवर एक्सफोलियंट म्हणून वापरू शकता. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करू शकता. यामुळे त्वचा मुलायम होते आणि त्वचेवरील मृत त्वचा नाहीसी होते.

* बॉडी स्क्रबमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे फायदे

या स्क्रबमध्ये नारळापासून काढलेले तेल त्वचेला हायड्रेट करण्यासाठी मदत करते. तसेच, याच्या वापरामुळे त्वचा नितळ दिसते. तर गुलाबाच्या पाकळ्या अँटी-बॅक्टेरियल स्वरूपात असतात. जे पुरळ आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत करते. तसेच त्वचा मॉइश्चराइझ ठेवते. याचा तुम्ही टोनर म्हणून सुद्धा वापर करू शकता. या बॉडी स्क्रबमध्ये साखरेचाही वापर केला जातो. यामुळे त्वचावरील तेलकटपणा आणि मृत त्वचा कमी होण्यास उपयुक्त ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT