Holi Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Skin Care Tips: होळी खेळण्याआधी तुमच्या त्वचेला ठेवा डॅमेज प्रूफ

दैनिक गोमन्तक

Holi Skin Care Tips: रंगाचा उत्सव म्हणजे होळी. भारतात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 8 मार्च होळी साजरी केली जाणार आहे.  बाजारपेठही विवध रंगांनी सजली आहे.

रंगांच्या या सणात खूप धूमधडाका, नाच-गाणी आणि एकमेकांना रंग लावून साजरा केला जातो. उत्सव साजरा करणे, रंगांशी खेळणे हे सर्व ठीक आहे. परंतु या काळात त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेउया.

  • त्वचेची अशी घ्या काळजी

सनस्क्रीन लावावे

जर तुम्ही होळी खेळणार असाल तर लक्षात ठेवा की त्वचेवर रंग लावण्यापूर्वी तुम्ही ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावावे. ते लावल्याने त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेला रंगांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण मिळते.

स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवा

रंगात केमिकल्स असतात. ते चेहऱ्यावर लावल्यास त्वचा आणखी कोरडी होते. हे टाळण्यासाठी, होळीच्या काही दिवस आधी स्निग्ध सेवन वाढवा. यामुळे त्वचा निरोगी राहते, तसेच हायड्रेटेड राहते. दही, रसाळ फळे, ताक किंवा ज्यूसमध्ये जे काही आवडते ते पिऊन तुम्ही तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवू शकता.

आईस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करावी

रंग खेळण्याआधी त्वचेवर आइस क्यूब लावावे. त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि जेव्हा तुम्ही होळी खेळता तेव्हा ते तुमच्या त्वचेत (Skin) बसत नाहीत.

त्वचेला मॉइश्चरायझ लावावे

होळी खेळण्याआधी त्वचेला मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. कोणतीही क्रीम वापरण्याऐवजी खोबरेल तेल लावावे किंवा बदाम आणि तिळाचे तेल लावू शकता. हे तेल लावल्याने त्वचेवर मुरुम येणार नाही. होळी खेळण्यापूर्वी हात, पाय आणि गालावर मोहरीच्या तेलाने हलके मसाज करा, त्याने रंगाचा प्रभाव कमी होईल.

फुल कपडे घालावे

होळी खेळताना पूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे घालावे. तुम्ही स्लीव्हलेस कपडे घातलेत तर हे केमिकलयुक्त असलेल रंग त्वचासाठी हानिकारक ठरु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT