Holi Health Tips For Diabetic Patients Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2025: होळीत 'या' रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, जाणून घ्या काय खावे अन् टाळावे?

Holi Health Tips For Diabetic Patients: होळीचा सण आनंदाने, रंगांनी आणि मौजमजेने भरलेला असतो, परंतु शुगर, लिव्हर आणि किडनीच्या रुग्णांनी कोणत्याही सणाला काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Manish Jadhav

Holi Celebration Health Risks For Diabetes Liver Kidney Patients

होळीचा सण आनंदाने, रंगांनी आणि मौजमजेने भरलेला असतो, परंतु शुगर, लिव्हर आणि किडनीच्या रुग्णांनी कोणत्याही सणाला काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर या लोकांनी रंगांचा आनंद घेताना योग्य आहार आणि खबरदारी घेतली नाही तर त्याचा या रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खरंतर, सर्वांना माहित आहे की होळीच्या दिवशी लोकांच्या घरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. काही लोक अशा पार्ट्यांमध्ये देखील जातात, जिथे नाश्त्याचे विविध पर्याय असतात आणि अल्कोहोल-आधारित पेये देखील असतात, ज्यामुळे या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

1. मधुमेहाच्या रुग्णांसाठी

मधुमेहाच्या रुग्णांनी सणांच्या काळात त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी, कारण यावेळी गोड पदार्थांचे सेवन वाढते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी होळीला साखरेऐवजी गुळापासून बनवलेल्या गोड पदार्थ खावेत. मसाले आणि मीठ कमी खावे. तसेच, या लोकांनी चिप्स, नमकीन किंवा स्नॅक्स सारख्या पॅकेज्ड पदार्थांचे सेवन कमी करावे. होळीच्या दिवशी शुगर-बेस्ड ड्रिंक्सऐवजी शक्य तितके साधे पाणी प्यावे.

2. लिव्हरचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी

होळीच्या दिवशी बाहेरील आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ले जाते. या सणात लोक दारु देखील पितात. हे दोन्ही घटक लिव्हरच्या आरोग्यासाठी (Health) चांगले नाहीत. होळीच्या वेळी लिव्हरच्या रुग्णांनी तळलेले पदार्थ शक्य तितके टाळावेत. होळी साजरी केल्यानंतर कोमट पाणी प्यावे. हे पाणी आवळा पावडर घालून पिणे फायदेशीर ठरते.

3. किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

होळीच्या (Holi) दिवशी अल्कोहोल आणि सोडा पेये पिणे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. चिप्स, नमकीन आणि पॅकेज केलेले पदार्थ खाणे टाळावे, कारण त्यात हानिकारक आम्लयुक्त घटक आणि मीठ असते, जे किडनीला हानी पोहोचवू शकतात. होळीच्या दिवशी किडनीच्या रुग्णांनी भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत.

इतर महत्त्वाच्या टिप्स

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त स्वीट्स पदार्थ किंवा नॅचुरल स्वीटनर्स असलेले गोड पदार्थ खाऊ शकता.

होळीनंतर व्यायाम, योगासने केल्याने ताण कमी होतो आणि थकवा दूर होतो.

होळीनंतर हलके अन्न कावे, ते अधिक फायदेशीर ठरते.

चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे, कारण त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

SCROLL FOR NEXT