Fruits For Diabetes Patients: मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' फळं नक्की खावीत, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

Sameer Amunekar

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, पण काही नैसर्गिक फळं मधुमेहग्रस्तांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

जांभूळ

जांभळामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात. त्याच्या बियांमध्ये जांबोसिन आणि अँथोसायनिन नावाचे घटक असतात, जे शुगर नियंत्रणात मदत करतात.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

सफरचंद

"An apple a day keeps the doctor away" हे वाक्य मधुमेहासाठीही लागू होते. सफरचंद फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असते, जे शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

डाळिंब

डाळिंबामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात, जे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास मदत करतात.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

संत्री

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन C, फायबर आणि नैसर्गिक साखर असते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि शरीर ताजेतवाने राहते.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

पपई

पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये कमी प्रमाणात साखर आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात.

Fruits for Diabetes Patients | Dainik Gomantak
Remedies to relieve stress | Dainik Gomantak
तणाव दूर करण्यासाठी उपाय