Scalp Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Scalp Care: होळीच्या रंगांनी टाळूला खाज सुटलीय, मग 'अशी' घ्या कास काळजी

Holi Care Tips: होळीचे रंग खेळल्यानंतर जर टाळू कोरडे होत असेल आणि खाज सुटत असेल तर तुम्ही पुढे सांगितलेले उपाय फॉलो करू शकता.

Puja Bonkile

holi 2024 scalp care beauty tips holi festival

यंदा होळी हा सण २५ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी रंगांशी खेळताना, रंग गालावर लावला की केसांना याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. जेव्हा रंगांशी खेळून रंग काढण्याचा विचार येतो तेव्हा गालावरील रंग काढून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु केसांमधले रंग चांगले स्वच्छ करू शकत नाही. टाळूवर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर टाळूलाही खाज सुटते आणि केसही कोरडे होतात.

होळीनंतर त्वचेची काळजी घेण्याबरोबरच केसांची काळजी घेण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. होळीच्या रंगांमध्ये असलेली रसायने केस कोरडे करतात. कोरडेपणामुळे टाळूला खाज येते आणि संसर्ग होण्याची शक्यताही वाढते. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

रंग खेळल्यानंतर, आपण आपले केस कमीतकमी 2 ते 3 वेळा शॅम्पूने धुतले पाहिजे. यानंतरही जर तुमच्या टाळूतून रंग निघत असेल तर रंग येणं थांबेपर्यंत केस पाण्याने स्वच्छ धुवावे.

शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर लावण्याऐवजी टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत कोरफड जेल लावावे. कोरफड जेलमध्ये कॉफी मिक्स करून स्कॅल्प स्क्रब करू शकता. यामुळे टाळू चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल.

  • दही लावा

केसांना दही लावल्याने अनेक फायदे मिळतात. हे स्कॅल्प एक्सफोलिएट करते आणि केसांना डीप कंडिशनिंग करते. दह्यात लिंबाचा रसही मिक्स करू शकता. यामुळे केसांना चमक येते. जर तुम्ही दह्यामध्ये अंडे मिक्स केले तर ते केसांसाठी आणखी चांगले होईल. कारण दही आणि अंडी दोन्ही प्रोटीनचे खूप चांगले स्त्रोत मानले जाते. या दोघांच्या मिश्रणाने तुम्ही केसांना प्रोटीन ट्रीटमेंट देऊ शकता.

  • गुलाब जल

गुलाब जलमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझर देखील असते. तुम्ही गुलाबजल थेट केसांना लावू शकता किंवा त्यात थोडे मध मिक्स करून लावू शकता. यामुळे तुमच्या टाळूवरची खाज थांबेल आणि तुमचे केसही चमकदार राहतील.

  • हेअर पॅक लावा

केसांना केळी, दही आणि मध यापासून बनवलेला हेअर पॅकही लावू शकता. हा हेअर पॅक 10 ते 15 मिनिटे केसांवर ठेवा आणि नंतर केस स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे. हे केसांसाठी घरगुती प्रथिने उपचारांसारखेच आहे. या उपायानंतर तुमचे केस खूप मऊ आणि चमकदार होतील.

  • तेल लावा

होळीच्या रंगांशी खेळल्यानंतर केस खूप कोरडे होतात. शॅम्पू केल्यानंतर केसांच्या मुळात तेलाने मसाज करा आणि नंतर 5 मिनिटे गरम टॉवेल ट्रीटमेंट घ्या. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल आणि तुमच्या केसांच्या मुळांना तेलही मिळेल. यामुळे तुमच्या केसांमधील सर्व कोरडेपणाही दूर होईल.

  • सीरम लावा

तुम्ही घरच्या घरी नारळाच्या पाण्याचे सीरम बनवू शकता. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर तुम्ही या मिश्रणात मध मिक्स करू शकता. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून नंतर केसांना लावा. असे केल्याने तुमचे केस हायड्रेटेड तर होतीलच शिवाय चमकदार देखील दिसू लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT