Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

Pregnancy High Blood Pressure: प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणाचा (Pregnancy) काळ खूप महत्त्वाचा असतो, पण याच काळात शरीरात अनेक बदल होतात.

Manish Jadhav

Pregnancy High Blood Pressure: प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणाचा (Pregnancy) काळ खूप महत्त्वाचा असतो, पण याच काळात शरीरात अनेक बदल होतात. असाच एक बदल म्हणजे अचानक वाढणारा रक्तदाब (Blood Pressure), जो एक गंभीर वैद्यकीय स्थिती असू शकतो. अनेकदा याला सामान्य समजले जाते, पण हा प्री-एक्लेम्पसिया (Pre-eclampsia) नावाच्या मोठ्या समस्येचा संकेत असू शकतो. हा आजार आई आणि बाळ दोघांच्याही जीविताला धोका निर्माण करु शकतो.

काय आहे प्री-एक्लेम्पसिया?

दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयातील डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, हा एक वैद्यकीय आजार आहे, जो गरोदर महिलांना होतो. यात रक्तदाब (BP) वाढण्यासोबतच लघवीमध्ये (Urine) प्रथिनांची (Protein) मात्रा वाढते. याचा अर्थ मूत्रपिंड (Kidney) योग्य प्रकारे काम करत नाही. जर 20 व्या आठवड्यानंतर असा रक्तदाब वाढला, तर ते धोकादायक ठरु शकते.

  • परिणाम: या आजारामुळे हळूहळू बाळाला ऑक्सिजन (Oxygen) आणि पोषण देणाऱ्या प्लेसेंटावर (Placenta) परिणाम होतो. यामुळे बाळाची वाढ खुंटू शकते, वेळेआधी प्रसूती होऊ शकते किंवा आईला झटके (Seizures) येण्याचा धोकाही वाढतो.

  • लक्षणे: यात डोके दुखणे (Headache), डोळ्यासमोर अंधारी येणे, पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे ही प्रमुख लक्षणे दिसतात.

प्री-एक्लेम्पसियाची कारणे

प्री-एक्लेम्पसियाची अनेक कारणे असू शकतात:

  • पहिल्यांदाच गर्भधारणा होणे.

  • जुळी मुले (Twins) असणे.

  • आधीपासून मूत्रपिंड किंवा रक्तदाबाचा आजार असणे.

  • लठ्ठपणा (Obesity), वाढते वय आणि जास्त ताण (Stress) यामुळेही हा आजार बळावू शकतो.

बचावासाठी उपाय

या गंभीर स्थितीपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

  • नियमित तपासणी: गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.

  • आहार: आहारात मिठाचे (Salt) प्रमाण कमी करा आणि पुरेसे पाणी प्या.

  • रक्तदाब तपासणी: नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करा.

  • ताण दूर ठेवा: स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्हाला डोकेदुखी, सतत उलट्या किंवा डोळ्यांना त्रास जाणवत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण गरोदरपणात कोणतीही शारीरिक समस्या गंभीर परिणाम देऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT