Hemophilia Disease Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hemophilia Disease: काय आहे हिमोफिलिया आजार? जखम झाल्यास थांबत नाही रक्त! रुग्ण सतत भीतीच्या सावटाखाली राहतो

Hemophilia Symptoms And Causes: हिमोफिलिया हा एक ब्लडिंग डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्त गोठणे थांबते. या आजारात लहानशा दुखापतीतूनही जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. या आजारामुळे रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमतरता देखील निर्माण होते.

Manish Jadhav

हिमोफिलिया हा एक ब्लडिंग डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्त गोठणे थांबते. या आजारात लहानशा दुखापतीतूनही जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. या आजारामुळे रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमतरता देखील निर्माण होते. चिंताजनक बाब म्हणजे यामुळे रुग्णाची मानसिक स्थितीही बिघडते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात क्लॉटिंग प्रोटीनची निर्मिती थांबते किंवा निर्धारित मानकापेक्षा कमी होते तेव्हा हा आजार होतो.

दरम्यान, सामन्यत:हा एखादी दुखापत झाली तर रक्तस्त्राव थांबतो. पण हिमोफिलियामध्ये असे होत नाही. यामध्ये एखाद्याला थोडीशीही दुखापत झाली तर खूप रक्तस्त्राव होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या (Patient) शरीरावर अनेक प्रकारच्या खुणा दिसतात. या खुणा काळ्या आणि निळ्या रंगाच्या असतात.

हिमोफिलिया आजार का होतो?

या आजाराबाबत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर सांगतात की, हा एक अनुवांशिक आजार आहे जो पालकांकडून मुलांमध्ये संक्रमित होतो. हा आजार जन्मतःच होतो. हा आजार तीन प्रकारचा असतो. या प्रकारांच्या अ, ब आणि क ला हिमोफिलिया म्हणतात. या आजारात जास्त रक्तस्त्राव झाल्याने रुग्णाला मृत्यूचा धोका देखील असतो. काही लोकांमध्ये या आजारामुळे मेंदूतूनही रक्तस्त्राव होऊ शकतो. तसेच, या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते.

हिमोफिलियाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

दुसरीकडे, या आजाराने ग्रस्त असणारा रुग्ण नेहमीच तणाव आणि चिंतेखाली राहतो. त्याला भीती राहते की, त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये. कारण थोडीशी दुखापत देखील त्याच्यासाठी जीवघेणी ठरु शकते. या आजारामुळे रुग्णाचा आत्मविश्वासही कमी होतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल चांडोक सांगतात की, या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी नेहमीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यामुळे समस्येचा सामना करणे सोपे होते. या आजाराबाबत लोकांना जागरुक राहणे देखील महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT