Helmet Buying Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Helmet Buying Tips: 'असे' निवडा स्वतःसाठी परफेक्ट हेल्मेट

Puja Bonkile

Helmet Buying Tips: आपल्यापैकी कित्येकांना वेगाचं आकर्षण असतं. वेगाने बाईक चालवण्याची क्रेझ तर गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. कित्येक गंभीर अपघात वारंवार समोर येऊनही 'धूम.. धूम..' म्हणत बाइक पळवणं अजूनही सुरूच आहे.

पण बाइक राइडरला अधिक संरक्षणाची गरज असते. सामान्यतः लोक पोलिसांचा दंड पडू नये म्हणून हेल्मेट घालतात. पण हा समज चुकीचा आहे. बाइक राइडच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट तयार करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्याने होणारे परिणाम अधिक गंभीर असल्याचे बहुतांश अपघातांमध्ये दिसून आले आहे.

त्यामुळे सरकारने बाइक राइडरसह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. अनेक वेळा लोकांना हेल्मेट छोटे होते किंवा मोठे होते. जर तुम्ही स्वतःसाठी हेल्मेट खरेदी करणार असाल तर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

हेल्मेटची क्वॉलिटी चेक करावी

नवीन हेल्मेट घेताना सर्वात आधी सुरक्षेचे मापदंड तपासावे. हेल्मेटवर आयएसआय चिन्ह असलेले हेल्मेट चांगल्या क्वॉलिटीचे असते. हेल्मेट खरेदी करताना त्याचे फिटिंग तपासणे अत्यंत गरजेचे आहे. डोक्याला बसेल असे हेल्मेट खरेदी करावे. हेल्मेटमध्ये चांगले व्हेंटीलेसन असावे. कारण ते बाइक चालवताना तुमचे डोके थंड ठेवेल.

हेल्टमेटची काच

बाइक रायडरने हेल्टमेटच्या क्वॉलिटीसह त्याचे काच देखील चेक करावे. कारण बाइक चालवतांना समोरचे स्पष्ट दिसले पाहिजे. चुकूनही काळ्या रंगाचे व्हिझर असलेले हेल्मेट खरेदी करू नका. कारण यामुळे रात्रीच्या वेळी बाइक लाचवताना काळ्या रंगाच्या व्हिझरमुळे त्रास होऊ शकतो. हेल्मेटमध्ये अँटी-फॉग फीचर असेल तर धुक्यात देखील बाइक चालवणे सोपे जाते.

हेल्मेटचे योग्य वजन

हेल्मेटचे वजन खूप महत्त्वाचे असते. हेल्मेट घातल्यानंतर डोक्याला जास्त जड वाटणार नाही असे हेल्मेट खरेदी करावे. फुल फेस आणि हाफ फेस असे दोन्ही हेल्मेट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बरेच लोक अधिक वेंटिलेशनसाठी हास फेस हेल्मेट खरेदी करतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण चेहऱ्याचे हेल्मेट खरेदी करणे चांगले.

स्पोर्ट्स बाईकसाठी कसे असावे हेल्मेट?

जर तुम्हाला स्पोर्ट्स बाईक चालवण्याची आवड असेल तर तुम्ही त्यासाठी ट्रॅक डे हेल्मेट खरेदी केले पाहिजे. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे फुल फेस हेल्मेट असते. जे अधिक संरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे असते. या हेल्मेट्समध्ये वरच्या बाजूला एअर व्हेंट्स असतात, ज्यातून हवा आत आणि बाहेर जावू शकते. त्याची किंमत सामान्य हेल्मेटपेक्षा थोडी जास्त असते परंतु हे हेल्मेट स्पोर्ट्स बाईक राइडरसाठी अधिक फायदेशीर असते.

अॅडव्हेंचर बाइक रायडिंग प्रेमींसाठी एडीव्ही हेल्मेट हे एक उत्तम मॉड्यूलर मोटोक्रॉस हेल्मेट सिद्ध होऊ शकते. याशिवाय आरामासाठी काही हेल्मेटमध्ये अतिरिक्त पॅडिंग देखील दिले जाते. अपघातादरम्यान तुमचे डोके या हेल्मेट्समध्ये सुरक्षित स्थितीत राहते. ज्यामुळे तुमचे इजा होण्यापासून संरक्षण होते. हलके प्लास्टिक व्हिझर असलेले हेल्मेट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT