Heart Attack Even When ECG Is Normal: हार्ट अटॅक ही खूप गंभीर वैद्यकीय समस्या आहे. यामध्ये हृदयाच्या स्नायूंपर्यंत रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही इशारे देते; पण अनेकदा लोक याला साधा थकवा, गॅस, पित्त किंवा तणाव समजून दुर्लक्ष करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅकची लक्षणे प्रत्येकामध्ये सारखीच नसतात. काहींना छातीत खूप दुखते, तर काहींना दुखण्याशिवाय इतर त्रास जाणवतात. अनेकदा ईसीजी रिपोर्ट नॉर्मल आला, तरी शरीरात आतून मोठे बदल घडत असतात. ईसीजीमुळे हृदयाची हालचाल आणि ठोके तपासले जातात; मात्र हार्ट अटॅकच्या वेळी ईसीजीमध्ये लगेच बदल दिसेलच असे नाही.
अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियमांनुसार, सुरुवातीला ईसीजी नॉर्मल येऊ शकतो. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा आल्यास किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यास सुरुवातीच्या ईसीजीमध्ये लगेच काही दिसत नाही. तसेच रक्ताची कमी झाल्यामुळे होणारे बदल थोड्या वेळाने दिसतात. त्यामुळे फक्त ईसीजीवर न थांबता ट्रोपोनिन ब्लड टेस्ट, इकोकार्डिओग्राफी किंवा पुन्हा ईसीजी केला जातो. नियमांनुसार, ईसीजीसोबत ट्रोपोनिन टेस्ट केली जाते आणि ती दिवसातून दोनदा वेगवेगळ्या वेळी केली जाते.
अनेकदा छातीत जळजळ किंवा दुखणे सुरु झाल्यावर लोक त्याला गॅस, अपचन किंवा स्नायूंचा ताण मानतात. पण हार्ट अटॅकमध्येही छातीत जळजळ, जडपणा किंवा अस्वस्थ वाटू शकते. खासकरुन छातीत दुखण्यासोबत धाप लागणे किंवा घाम येत असेल, तर लगेच डॉक्टरांची मदत घ्यावी. छातीत दुखण्याबरोबर श्वास घ्यायला त्रास होणे, एकदम अशक्तपणा येणे, चक्कर येणे किंवा थंड घाम येणे हे धोक्याचे संकेत असू शकतात. छातीत अचानक दाब किंवा वेदना जाणवल्यास काही वेळाने आपोआप बरे होईल अशी वाट न पाहता लगेच रुग्णालयात (Hospital) जाणे खूप गरजेचे असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.