Food in Freeze Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हीही फ्रीजमध्ये टोमॅटो अन् पनीर ठेवतायं? ही बातमी आधी वाचाच

हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा असो आपण अन्न, फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण चीज आणि टोमॅटो ठेवणे टाळावे.

दैनिक गोमन्तक

Food in Freeze: हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा असो, आपण अन्न, फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो. एवढेच नाही तर शिळे अन्नही फ्रीजमध्ये ठेवले जाते. जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करता येईल. 

बहुतेक घरांमध्ये फ्रिज हा फळे, भाज्या, सॉस, चीज इत्यादींनी भरलेला असतो. पण सर्वकाही फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही. फक्त काही फळे आणि भाज्या आहेत ज्या तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. प्रत्येक भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर त्याची टेस्ट थोडी बदलते. 

  • टोमॅटो आणि पनीर फ्रीजमध्ये ठेवल्याने काय नुकसान आहे? 

टोमॅटो

तज्ज्ञांच्या मते टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची नैसर्गिक चव नष्ट होते. एवढेच नाही तर काही वेळाने ते मऊ होऊ लागतात.आरोग्य तज्ञांच्या मते थंड टोमॅटो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. टोमॅटो सामान्य तापमानात ठेवावेत. 

केळी

केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने ती काळी पडतात. त्यामुळे केळीची चव खराब होते. म्हणूनच केळी सामान्य तापमानात ठेवावीत. केळी मऊ किंवा काळी झाली असेल तर त्याची स्मूदी बनवु शकता.

कांदा आणि लसूण फ्रीजमध्ये ठेवू नका

लसूण आणि कांदा फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे त्यात बुरशी येऊ शकते. त्यामुळे जेव्हा केव्हा फ्रिजमध्ये लसूण आणि लवडा ठेवण्याचा विचार कराल तेव्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामुळे तिचे काही बिघडणार नाही. 

पनीर

पनीर फ्रीजमध्ये ठेवल्याने ते घट्ट होते आणि त्याची चवही बदलते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही पनीर फ्रीजमध्ये ठेवाल तेव्हा गरम पाण्यात थोडा वेळ उकळा. 

किचनमधील 'या' गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेऊ नका

टरबूज-खरबूज

टरबूज आणि खरबूज फ्रीजमध्ये ठेवणे टाळा, विशेषतः ते अर्धे कापल्यानंतर ठेऊ नये. असे केल्याने या फळांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स नष्ट होतात, तसेच त्यांची चवही बदलू लागते.

मध

मधही फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. वास्तविक मध फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग आणि रूप बदलते. असे केल्याने, मधामध्ये क्रिस्टल्स तयार होतात, जे आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाहीत.

संत्री-लिंबू

संत्री आणि लिंबू यांसारखी सायट्रिक फळेही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. या गोष्टी आम्लयुक्त आहेत आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास, थंड तापमान त्यांना लवकर खराब करू शकते.

ब्रेड

बाजारातून ब्रेड आणताच लोक प्रथम फ्रिजमध्ये ठेवतात. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे कारण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर सुकायला लागते. त्यामुळे त्याची चवही बदलते.

बटाटे

बरेच लोक बटाटे मोठ्या प्रमाणात घेतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च खराब होते. त्यामुळे त्याची चव खूप खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT