difference between heart failure and heart attact Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: हार्ट फेल्युअर अन् हार्ट अटॅक यात फरक काय? वाचा एका क्लिकवर

हार्ट फेल होणे आणि हार्ट अटॅक येणे या दोन्हीमध्ये खुप अंतर आहे.

दैनिक गोमन्तक

Difference Between Heart Failure & Heart Attact: धावपळीचे जीवन आणि अयोग्य आहार यासारख्या कारणांमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पण अनेक लोकांना हार्ट अटॅक आणि हार्ट फेल होणे यामधला फरक कळत नाही. यामध्ये खुप फरक असुन याची लक्षण देखील वेगळी आहेत.

  • हार्ट फेल्युअर अन् हार्ट अटॅकमधील फरक

हृदयविकाराचा झटका अचानक कोणालाही येउ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे म्हणजेच हार्ट ब्लॉकेज झाल्यामुळे अचानक रक्त प्रवाह थांबतो, याला हृदयविकाराचा झटका म्हणतात.

हृदयाचे स्नायू कमकुवत होण म्हणजे हार्ट फेल होणे. हृदय बंद तेव्हा पडतं जेव्हा आपलं हृदय प्रभावीपणे रक्त पंप करण्यास असमर्थ असते. ह्या कारणामुळे रक्त संपूर्ण शरीरापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आणि ह्या स्थितीला हृदय बंद पडणे किंवा हार्ट फेल्युअर म्हणतात. यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि हृदयाचे ठोके थांबतात.

  • हार्ट फेल होण्याची लक्षणे

  1. खोकला

  2. हृदयाचा ठोका कमी जास्त होणे

  3. खूप कमी भूक लागणे

  4. पाय सुजणे

  5. जास्त लघवी येणे

तुम्हाला जर थोडे काम करुन देखील थकवा जाणवत असेल तर हृदयरोगाची लक्षणं असु शकते. अनेक लोकांना श्वास घेतांना त्रास होतो. अनेक लोकांना नेहमी खोकला असतो. यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

Heart Failure
  • हार्ट अटॅकची लक्षणे

  1. श्वास घेण्यात अडचण येते.

  2. पाय सुजतात

  3. छातीत दुखते

  4. जास्त थकवा जाणवतो

  5. अशक्तपणा जाणवतो

  6. चक्कर येतात

  7. अस्वस्थ वाटते

जेव्हा तुमच्या हृदयावर ताण येतो तेव्हा ही सर्व लक्षणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. हृदय शरीराला रक्त पुरवठा करु शकत नाही. शरीरात ऑक्सिजन आणि पोषक घटकांची कमतरता असते आणि शरीरात हानिकारक घटक वाढू लागतात. यामुळे अशा समस्या निर्माण होतात.

heart attack

कोणती काळजी घ्यावी

  • पोषक आहार

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. हृदयविकारात आपला आहार अतिशय संतुलित प्रमाणात ठेवावा लागतो.यामुळे आहाराकडे लक्ष द्यावे.

  • योगा

योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहता. जर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली तर तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता आणि हृदयविकारापासून देखील दुर राहु शकता. .

  • मद्यपान आणि ध्रुमपान

या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीराचे खूप नुकसान होउ शकते. जर तुम्हाला तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

SCROLL FOR NEXT