Evening Snacks| food| health csre tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: हेल्दी आणि लो कॅलरी पदार्थांचे सेवन आरोग्यदायी

Healthy Tips: उन्हाळ्यात दुपारचे जेवण करूनही संध्याकाळी जेवणापूर्वी भूक लागते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने संध्याकाळी सर्वानाच खूप भूक लागलेली असते. यावेळी आपल्याला काहीतरी झटपट आणि चवदार खावेसे वाटते. अशा वेळी जंक फूड खाल्ल्याने पोटासंबंधित आजरा होऊ शकते. यामुळे हे पदार्थ खाणे टाळून पोषक आणि फायबरने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.चला तर मग जाणून घेऊया आरोग्यदायी (Healthy) तसेच चवदार असे कोणते पदार्थ आहेत. (Evening Snacks Tips news)

* कॉर्न सॅलड

हे सॅलड बनवण्यासाठी 4 कप कॉर्न घ्यावे आणि त्यात थोडे चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेले कांदे, आणि ऑलिव्ह ऑईल घाला. नंतर चवीनुसार मीठ आणि मिरपूड टाकावे. तुम्ही यावर लिंबू देखील मिक्स करू शकता.

* स्प्राउट्स

1 कप स्प्राउट्समध्ये बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटोमध्ये मिक्स करावे. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक कप उकडलेले बटाटे घालावे. एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालावे. चांगले मिक्स केल्यानंतर कोथिंबीरी टाकून सजवू सर्व्ह करू शकता.

* भाजलेले चणे

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही भाजलेले चणे खाऊ शकता. यासाठी चणे गरम पाण्यात मुरात ठेवावे.नंतर हे चणे काढून घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये तेल जिरे, तिखट चवीनुसार मीठ एकत्र करून चण्यावर टाकावे.

* मुरमुरे चिवडा

हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. हा चिवडा बनवण्यासाठी पहिले मुरमुरे भाजून घ्यावे. नंतर यामध्ये तिखट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकू शकता. नंतर यावर कोथिंबीर टाकून मस्त खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT