Healthy Life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips for Healthy Life: 'या' 8 गोष्टी तुम्हाला निरोगी अन् आनंदी आयुष्य जगण्यास करतील मदत

Tips for Healthy Life: तुम्हाला जर आयुष्य आनंदी आणि निरोगी जगायचे असेल तर तुम्हाला लाइफस्टाइलमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Tips for Healthy Life: तुम्हाला जर चांगले आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला लाइफस्टाइलमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून माणसाची जगण्याची क्षमता वाढवता येते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते बदल करणे आवश्यक आहे.

  • संतुलित आहार

फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स यासह पौष्टिक-समृद्ध अन्न खाल्ल्याने एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तुमचे आयुष्य वाढू शकते.

  • व्यायाम

नियमितपणे व्यायाम करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगी राहते.

  • वजन नियंत्रणात ठेवणे

लठ्ठपणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या वयावरही होतो. अशावेळी वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.

  • पुरेशी झोप

अपुरी झोप घेतल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे नियमितपणे ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही आनंदात दीर्घायुष्य जगु शकता.

  • ताण

तणावाचा तुमच्या आरोग्यावर तसेच वयावर खूप वाईट परिणाम होतो. तणावामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • सामाजिक संबंध

मजबूत सामाजिक संबंध राखणे आणि मित्र आणि कुटुंबाचे चांगले नेटवर्क असणे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे तुमचे आयुष्य वाढते. मजबूत सामाजिक संबंधांमुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

  • मद्यापान

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे आयुष्य कमी होऊ शकते. तुम्ही फळांचा फ्रेश ज्युस पिऊ शकता.

  • पाणी पिणे

हायड्रेटेड राहिल्याने तुमच्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. दररोज किमान 2 लिटर पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT