Why do you fall asleep after a meal Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Food Tips: तुम्हालाही जेवणानंतर झोप का येते?

अधिक जेवण केल्याने पचनसंस्थेवर (Digestive system) ताण येतो.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना जेवण (Meals) झाल्यानंतर अधिक झोप (Sleep) येते. तसेच अनेक लोकांना थकवा (Fatigue) जाणवतो. जेवणानंतर झोप (Sleep) येणे हे साहजिकच आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा अन्न पोटात जाते तेव्हा ते शरीराच्या विविध भागात पोहोचते. जेवण झाल्यानंतर आपल्याला ऊर्जा (Energy) मिळते. जेवण झाल्यानंतर थकवा आणि झोप येण्यामागचे नेमक कारण काय आहे हे जाणून घेवुया.

* अधिक जेवण करणे

जेवण झाल्यानंतर झोप आणि थकवा का जाणवतो, असा प्रश्न प्रत्येकांच्या मनात येत असतो. याचे कारण म्हणजे तुम्ही किती खाता यावर अवलंबून असते. अधिक जेवण केल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. याकरिता खूप ऊर्जा खर्च होते. यामुळे तुम्हाला थकवा जाणवू लागतो. म्हणूनच योग्य प्रमाणात पदार्थांचे सेवन करावे.

* फॅट आणि कार्बन

रोजच्या जेवणात जर तुम्ही फॅट आणि कार्बनचा अधिक वापर करत असाल तर तुम्हाला झोप येवू शकते. हाय फॅट आणि कॅलरीयुक्त पिझ्झा खाल्ल्याने देखील अधिक झोप येऊ शकते. तज्ञांच्या मते, हाय फॅट पदार्थ खाल्ल्याने सीसीकेमध्ये वाढ होऊन जेवणानंतर अधिक झोप येते.

* धूम्रपान टाळा

जेवण झाल्यानंतर धूम्रपान केल्याने अधिक आळस येऊ शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन झोप येवू लागते. परंतु तुम्ही जर झोपण्याआधी धूम्रपान करत असाल तर तुमच्या झोपेवर याचा परिणाम होतो. तसेच याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरही होतात. यामुळे धूम्रपान करणे टाळावे.

*​ हार्मोन्समध्ये बदल होणे

जेवण झाल्यानंतर तुम्हाला जर अधिक थकवा जाणवत असेल तर आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, अशक्तपणा यामुळे देखील जेवणानंतर झोप येते. जेवणानंतर झोप येणे ही एक सामान्य समस्या आहे असे वाटते. परंतु या मागे कोणती कारणे आहेत हे कोणालाच माहिती नसतात. याबद्दल आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT