Healthy Desserts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Desserts: 'या' 4 मिष्टान्नाचा करा आहारात समावेश

ब्ल्युबेरी दहीपासून (Blueberry yogurt) ते चीया चॉकलेट पुडिंगपर्यंत तुम्ही घरीच विविध पदार्थ बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक गोड पदार्थ (Dessert) आवडीने खातात. परंतु अनेकजन लठ्ठपणा आणि मधूमेहामुळे (Diabetes) गोड पदार्थ खाणे टाळतात. अशा परिस्थितीत आपण काही हेल्दी (Healthy Dessert) पदार्थ देखील खाऊ शकतो. हे पदार्थ फक्त हेल्दी (Healthy) नसून चवीला स्वादिष्ट (Delicious) आहेत. ब्ल्युबेरी दहीपासून (Blueberry yogurt) ते चीया चॉकलेट पुडिंगपर्यंत तुम्ही घरीच विविध पदार्थ बनवू शकता. जाणून घेऊया असे कोणते आरोग्यदायी पदार्थ आहेत जे घरी बनवू शकता.

Blueberry yogurt

* ब्ल्युबेरी दही

जर तुम्हाला वेगवेगळ्या चवीचे दही खायला आवधात असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. ही रेसिपी तयार करण्यासाठी 2 कप ब्ल्युबेरी मिक्स करा. त्यात 2 कप ब्ल्युबेरी मिक्स करा. त्यात 2 कप दही, 1 चमचा चीया दाणे आणि 2 चमचे मध घाला. ते एका भांड्यात चांगले मिक्स करावे. नंतर एक तास फ्रीजमध्ये ठेवावे. याची चव वाढवण्यासाठी ब्ल्युबेरीचे तुकडे वरुण टाकू शकता. खाण्यासाठी तयार आहे तुमची स्वादिष्ट ब्ल्युबेरी दही.

Custard

* कस्टर्ड

कस्टर्ड बनवणे खूप सोपे असून काही वेळातच तयार होणार हा पदार्थ आहे. हे तयार करण्यासाठी फक्त कस्टर्ड पावडर, दूध आणि काही फळे घ्यावी. कस्टर्ड बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप गरम दूध घ्यावे. यात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकावे. दुधात ही पावडर चांगली मिक्स करून घ्यावी. नंतर यात 2 चमचे मध, साखर किंवा गूळ टाकावा. सगळ्यात शेवटी सफरचंद, केळी, आणि द्राक्षे तुम्हाला आवडणारी फळे बारीक चिरून घ्यावी. यांचे मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर थोडावेळ फ्रीजमध्ये ठवावे. सर्व्ह कस्टर्ड थंड झाल्यावर खाण्यासाठी तयार आहे.

Banana then cake

* केळी मग केक

हेल्डी केकसाठी तुम्ही केळीच मग केक ट्राय करू शकता. हे खायला चवदार आणि हेल्डी आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी सर्वात आधी केळी चांगली मॅश करून घ्यावीत. तयार 1 चमचा ब्राऊन शुगर, 1 चमचा दूध आणि 1 चमचा वेनिला एसेन्स चांगले मिक्स करावे. नंतर त्यात 3 चमचे पीठ घालून मिश्रण तयार करावे. मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही केक शिजवू शकता. सर्वात शेवटी चोको चिप्सने केकची सजावट करू शकता.

Chia chocolate pudding

* चीया चॉकलेट पुडिंग

चीया चॉकलेट पुडिंग पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला 4 खजूर, 2 चमचे कोको पावडर, 2 चमचे चीया बियाणे आणि 3 ते 4 कप बदाम दूध घ्यावे. आता सर्वात आधी खजूर, चीया बियाणे, बदाम दूध एकत्र मिक्स करून घ्यावे. चांगले एकजीव झालेले मिश्रण एका बाउलमध्ये काढावे. नंतर सेट होण्यासाठी 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. थंड झालेले चिया चॉकलेट पुडिंग सजवण्यासाठी सुकामेवा किंवा चॉकलेटचे बारीक तुकडे टाकावे आणि चिया चॉकलेट पुडिंग सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT