Health Care Tips | Health Care Diet| Hair Care Routine | Weight Loss Tips
Health Care Tips | Health Care Diet| Hair Care Routine | Weight Loss Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care: नव्या वर्षात चुकीच्या डाएटचे फॅड डोक्यात असेल तर...

दैनिक गोमन्तक

Health Care Tips : नव्या वर्षात अनेक लोक वजन कमी करण्याचा संकल्प करतात. पण झटपट वजन कमी करण्याच्या नादात अनेक लोक चुकीच्या पदार्थांचे करताता. यामुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. सर्व प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे की झटपट वजन कमी करणे हा शरीरावर विपरित परिणाम करतो. वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

  • प्रत्येकासाठी एकच आहार (Diet) असतो हा विचार करणे चुकीचे आहे. तुमच्यासाठी कोणता आहार सर्वोत्तम योग्य राहिल हे ठरवताना तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तपासणे आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल तर तुम्हाला कमी ऊर्जा असलेल्या आहार फायदेशीर ठरतो.

  • जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 ची खालावलेली पातळी

    किंवा तुमचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरित परिणाम होउ शकतो.

  • क्रॅश डाएटिंगचे (Crash Diet) फॅड टाळा. सोशल मीडियावरील (Social Media) विचित्र डाएट फॅड्सचा अवलंब करणे टाळा. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा (Fruits) समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत. तुमच्या शरीराला एकूण सर्वच प्रकारच्या आहाराची गरज असते मग ते गोड, आंबट किंवा कडू असो, परंतु केवळ थोड्या प्रमाणात. सर्वकाही खा परंतु केवळ संयमाने. जर तुम्ही या डाएट फॅड्सचे पालन केले तर तुम्ही कमकुवत होऊन आजारी पडू शकाल.

  • चांगला आणि वाईट असा कोणता प्रकार नसतो. तुम्ही जर आवड्याभरात 100 पौष्टिक पदार्थ खाल्ले आणि केवळ एखादा चटपटीत पदार्थ खाल्ला तर लगेचच तुमच्या शरीरात वाईट परिणाम होणार नाही. संतुलित आहारामध्ये प्रत्येक पदार्थाला स्थान दिले जाते. सर्व पोषक तत्वांचा आहारात समावेश असल्याची खात्री करा आणि आपले ताट नेहमी रंगीत पदार्थांनी भरलेले असू द्या.

  • स्वतःच्या मर्जीने आहार न घेता आहारतज्ञांचा सल्ला घ्या. आहारतज्ञ आणि पोषणतज्ञांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि अभ्यासानंतर या विभागातील पदवी संपादन केली आहे. केवळ आवश्यक प्रमाणपत्रे असलेल्या आहारतज्ञांना "आहारतज्ञ" हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली आहे.

  • फळे, भाज्या, सर्व प्रकारचे धान्य, कार्बोहायड्रेट्स, शेंगदाणे, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश फायदेशीर राहिल. पुरेसे पाणी प्या, भरपूर फळे आणि ताज्या भाज्या खा, तुमच्या प्रत्येक आहारात प्रथिनांचा समावेश करा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT