Health Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: गुडघ्यांमधून कट-कट आवाज येण्यामागे असू शकते 'हे' कारण, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

गुडघ्यातून येणाऱ्या आवाजामुळे गंभीर आजार निर्माण होऊ शकते.

Puja Bonkile

Health Care Tips: गुडघ्याच्या सांध्यातून कट आवाज आल्याने खूप त्रास होतो. काही लोक म्हणतात की ही गंभीर समस्येची सुरुवात असते. तर काही लोकांना असे वाटते की हे गुडघा खराब होण्याचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे गुडघे आणि सांध्यातून आवाज येतो. बसताना, उठताना किंवा अचानक उठून समोर चालताना गुडघ्यातून आवाज आला तर तुम्हाला म्हातार म्हणून चिडवल जाते. पण असा आवाज का येतो हे जाणून घेऊया.

जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या गुडघ्यातून आवाज आला परंतु त्याच्या पायात वेदना किंवा सूज नसेल तर ही वेदना सामान्य असते. खरं तर सांध्याच्या आत एक द्रव असतो. याला आपण सायनोव्हीयल फ्लुइड म्हणून ओळखतो. यामध्ये गॅस असते. गुडघ्यांमधून आवाज येण्यामागे वाढते वय हे देखील कारण असू शकते. विशेषत: जसजसे वय वाढते तसतसे काही सांध्यांचे कार्य नीट होत नाही. अनेकवेळा असे घडते की गुडघ्यात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली तर त्याचा थेट परिणाम साध्यांवर होतो. त्यामुळे गुडघ्यांमधून आवाज येऊ लागतो. 

अशाप्रकारे तुम्‍ही रॅटलिंग आवाजापासून मुक्त होऊ शकता

  • दररोज व्यायाम करावा

जर तुमच्या गुडघ्यांमधून जास्त आवाज येत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करावा. नियमितपणे व्यायम केल्याने घुडग्या संबंधित समस्या कमी होतात. 

  • योग्य आहार आणि लाइफस्टाइल

चांगला आहार आणि लाइफस्टाइल तुमचे आयुष्य चांगले बनवते. पण अयोग्य आहार आणि चुकीची लाइफस्टाइल असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 

  • पोषक घटक

जर तुम्हालाही तुमच्या हाडांमधून कट-कट आवाज येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अधिकाधिक जीवनसत्त्वे, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, निरोगी चरबी, फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.  तसेच अंडी, दूध, दही आणि मासे भरपूर प्रमाणात खावेत. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

SCROLL FOR NEXT