Wedding Planning Tips: अशी तयारी जी मिटवेल लग्नाची चिंता, टेन्शन फ्री विवाह पार पाडण्यासाठी सोप्या ट्रिक्स

Wedding Planning Tips: लग्नाची तयारी करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला टेन्शन येणार नाही.
Wedding Planning Tips
Wedding Planning TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Wedding Planning Tips: लग्न हे प्रत्येक कुटुंबासाठी एक मोठा उत्साहच असतो. यामध्ये 'साखरपुडा' समारंभापासून 'पाठवणी' पर्यंतचे काम कधीच संपत नाही. वधू-वरांचे पालक लग्नाच्या दिवसापर्यंतच्या तयारीत इतके बिझी असतात की अनेक वेळा त्यांना लग्नाच्या प्रत्येक विधीचा आनंद घेता येत नाही.

सध्या लग्नाच्या तयारीसाठी इव्हेंट प्लॅनरचा ट्रेंड वाढला असला तरी लग्नघरात अजूनही अशी बरीच कामे केली जातात जी स्वतःच करावी लागतात. लग्नाचे तुम्हाला उत्तम नियोजन करायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • लग्नाची तारीख ठरवावी

लग्नाच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी सर्वात पहिले लग्नाची तारिख ठरवावी. पंडितांकडून शुभ मुहुर्त काढून लग्नाची तारिख फिक्स करावी. त्यामुळे लग्नाची मजा द्विगुणित होईल.

  • सर्वांना थोडे थोडे काम वाटून द्यावे

विवाह हा एक सामूहिक उत्साह आहे. हा उत्साह तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा प्रत्येक सदस्य आपली कामे योग्यरित्या करतो. लग्नाची तयारी आणि व्यवस्थापन पाहण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रांना थोडे थोडे काम वाटून द्यावे. यामुळे एका कोणा व्यक्तीवर कामाचे ताण येणार नाही.

खर्चाचे नियोजन करावे

  • लग्नाचे ठिकाण

लग्नात बजेट ठरवून खर्च करावा. यासाठी लग्नाचे ठिकाण ठरवतांना बजेटमध्ये बसेल असेच ठिकाण निवडावे. सध्या लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम केवळ एक-दोन दिवसांतच आयोजित करण्याचा ट्रेंड आहे. यामुळे जास्त खर्च होणार नाही.

  • पत्रिका

निमंत्रण पत्रिकासाठी सहसा खूप लोक बजेट बनवत नाहीत. पण कधी कधी हा खर्च लग्नाच्या बजेटवरही परिणाम करू शकतो. निमंत्रण पत्रिका छापण्याच्या खर्चाव्यतिरिक्त, आजकाल ई-कार्ड आणि व्हिडिओ बनवले जातात.यासाठी वेगळा बजेट बनवावा.

  • केटरिंग

केटरिंग हा देखील लग्नात मोठा खर्च असतो. तरी आजकाल ते लग्नाच्या ठिकाणासोबतच फायनल केले जाते. पण लग्नात असे अनेक कार्यक्रम असतात जे पाहुण्यांसाठी खास आयोजीत केले जाते. योग्य केटरिंग बजेट बनवण्यासाठी प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वधू-वरांच्या पाहुण्यांची यादी तयार करावी.

  • शॉपिंग

लग्नाची खरेदी ही शेवटपर्यंत सुरूच असते. यामुळे शॉपिंगला जाताना यादी तयार करावी. आवश्यक गोष्टींच खरेदी करावी. यामुळे खर्चावर नियंत्रण राहते.

महत्वाचे मुद्दे कोणते

  • टू डू लिस्ट

लग्नाच्या तयारीसाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी यादी करणे गरजेचे आहे.

  • चेक लिस्ट

लग्नाशी संबंधित सर्व काही चेक लिस्टमध्ये आहे. महत्त्वाच्या गोष्टी लिहित राहावे आणि कोणतीही विशिष्ट बाब विसरली जात नाही ना हे तपासत राहावे.

  • गेस्ट लिस्ट

अतिथींच्या नावांची यादी तयार करावी. त्यांच्यात काही जवळचे देखील आहेत. त्यांची नावे स्वतंत्रपणे लिहावे. यादीनुसार निमंत्रण द्यावे आणि भेटवस्तू खरेदी कराव्या.

  • पंडितांची यादी

लग्नात आणि दुकानात पूजा वगैरेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी बनवावी. म्हणजे वेळेवर तुमची इकडे तिकडे धावपळ होणार नाही.

  • फोटोग्राफी-वेडिंग प्लॅनर

दिवाळीच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आठवणींचे जतन करण्यासाठी फोटोग्राफी महत्त्वाचे आहे. त्यामुळे फोटोग्राफर कसा असावा, कोणत्या प्रकारचे फोटोशूट ट्रेंडमध्ये आहे,ड्रोन फोटोग्राफीला परवानगी आहे की नाही? यासारख्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

तसेच इव्हेंट प्लॅनरकडून जुन्या ग्राहकांची यादी घ्यावी. क्लायंटकडून फीडबॅक घेतल्यानंतरच इव्हेंट प्लॅनर ठरवावा. अशा प्रकारे या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर लग्नाच्या दिवशी कोणतेही टेन्शन येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com