Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes: दिवाळीत जास्त मिठाई खाल्लीय? मग 'या' लक्षणांवरून ओळखा मधुमेह वाढला आहे की नाही

दिवाळीत खुप गोड पदार्थ खाल्ले असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून हे समजते की तुमच्या रक्तातील साखर वाढली आहे.

Puja Bonkile

Diabetes: दिवाळीत गोड पदार्थ खाण्याची मज्जाच वेगळी असते. पण गोड खाल्ल्याने शरीरावर अनेक विपरित परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर काही शरीरात बदल दिसत असेल तर समजुन जा की रक्तातील साखर वाढली आहे.

जास्त गोड खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे शरीर आतून अस्वस्थ होऊ लागते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब आणि सूज येऊ शकते. शरीराला योग्य पोषण न मिळाल्यास त्वचेवर सुरकुत्या स्पष्टपणे दिसू शकतात. त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन कमी झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. जर तुम्हाला हे सर्व टाळायचे असेल तर तुम्ही तुमच्या शरीरातील पुढील लक्षण पाहून उपचार करू शकता.

हाय बीपी

शरीरात फक्त मीठच नाही तर साखर देखील तुमचा रक्तदाब वाढवू शकते. निरोगी रक्तदाबासाठी सोडियम इंजेक्शन घेण्यापेक्षा साखरेचे सेवन नियत्रणात ठेवावे.

वजन वाढणे

जास्त साखर म्हणजे जास्त कॅलरीज आणि त्यात प्रथिने किंवा फायबर नसल्यामुळे ते जास्त काळ पोट भरत नाही. याशिवाय जास्त गोड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे तुमच्या पोटात चरबी इतरत्र जमा होऊ लागते.

झोपेची समस्या

गोड पदार्थ खाल्ल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. संशोधनानुसार जास्त साखर खाल्ल्याने झोप खराब होते. एकदा ही लक्षणे लक्षात आली की, आपल्या आहारात बदल करावा.

कमी ऊर्जा असणे

तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण वाढल्याने तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. कारण बहुतेक साखरयुक्त पदार्थांमध्ये पोषणाचा अभाव असतो.तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.

पुरळ

जर तुम्ही मुरुम, सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्यांशी झुंज देत असाल तर तुम्ही किती साखरेचे सेवन करत आहात याचा विचार करणे आवश्यक आहे. जास्त साखरेचे सेवन केल्याने एंड्रोजनची पातळी वाढते ज्यामुळे मुरुमाची समस्या वाढते.

सांधेदुखी

काही अभ्यासानुसार जास्त साखरेमुळे जळजळ होते. यामुळे महिलांमध्ये संधिवाताची समस्या वाढू शकते. त्यामुळे सांधेदुखी हा देखील साखरेच्या अतिसेवनाचा एक दुष्परिणाम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT