Health Care Tips: दिवाळीत पोटासंबंधित आजार निर्माण झाले असेल तर करा 'हे' सोपे उपाय

सणांमध्ये वारंवार अति खाण्यामुळे पोटासंबंधित आजार निर्माण होतात.
Diwali 2023
Diwali 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Health Care Tips: दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी आणि बाहेर खाण्यासाठी काही ना काही मिळतं. अशावेळी अति खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या अगदी सामान्य बनते. पोटदुखी आणि आजारपणामुळे सणाची मज्जा निघुण जाते. काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर अति खाणे किंवा अन्नातून विषबाधा टाळता येते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

  • हळूहळू खावे

आपले पोट भरले आहे हे समजण्यासाठी आपल्या मेंदूला सुमारे 20 मिनिटे लागतात. जर तुम्हाला जास्त खाणे टाळायचे असेल तर अन्नाची चव घ्या आणि हळूहळू खावे. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • प्रोबायोटिक पदार्थ खा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आतडे निरोगी राहणे गरजेचे आहे. आतडे आरोग्य सुधारण्यासाठी लोक अनेकदा प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घेतात. परंतु तुमच्या आहारात नैसर्गिक प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करून तुम्ही अन्न विषबाधा होण्याचा धोका कमी करू शकता. दही, ताक आणि नैसर्गिक आंबवलेले पदार्थ यांचा आहारात समावेश करावा.

  • पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा

तुमच्या आहारात फायबर युक्त गोष्टींचा समावेश केल्यास तुम्हाला जास्त भुक लागणार नाही. आपल्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. रोटी-भात ऐवजी कडधान्य, अंडी, चीज अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. भिजवलेल्या काजूचेही सेवन करावे. स्ट्रीट फूड खाणे टाळा आणि बाहेर जेवायला गेलात तरच योग्य ठिकाणी जावे.

जेवणा दरम्यान ब्रेक घ्यावा

जर तुमचे पोट आधीच भरले असेल तर जेवताना ब्रेक घ्यायला विसरू नका. यामुळे पोटाला अन्न पचण्यास मदत होते आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. यामुळे अति खाणे आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही कमी होतो.

अन्नाकडे लक्ष द्यावे

जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुमचे लक्ष फक्त खाण्यावर असावे. टीव्ही, मोबाईल इत्यादी गोष्टी पाहताना कधीही जेवण करू नका. यामुळे लक्ष विचलित होते आणि जास्त जेवण होते. हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

पाणी प्यावे

दिवसभर भरपुर पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पोटही दीर्घकाळ भरलेले राहते. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून वाचवते. जास्त खाणे किंवा अन्न विषबाधासारख्या समस्या उद्भवू शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com