Milk Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Milk Benefits: गाई-म्हशीपेक्षाही बकरीचे दूध आहे जास्त आरोग्यदायी, वाचा काय आहेत फायदे

शेळीच्या दुधामुळे ऍलर्जीचा आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त दुधात कॅल्शियम, 'ड' जीवनसत्त्व असते, जे हृदय सुदृढ राखते आणि आपले वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करते. एका संशोधनातून असं सिद्ध झालंय कि गाई-म्हशीपेक्षा बकरीचे दूध जास्त फायदेशीर आहे.

शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरेचजण चांगले आरोग्य आणि फिटनेससाठी शेळीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. शेळीचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेकजण रोजच्या वापरासाठी शेळीचे दूध वापरतात. शेळीच्या दुधामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते.

शेळीचे दूध आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय क्रिया वाढविण्याचे काम करते, तसेच डेंग्यू सारख्या धोकादायक आजारातही ते खूप फायदेशीर आहे. शेळीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जास्त घट्ट असते. मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शेळीचे दूध सर्वांनाच पचत नाही आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल असेही नाही. त्यामुळे शेळीचे दूध नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे,

शेळीच्या दुधामुळे दुधाच्या ऍलर्जीचा आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तसेच छातीत जळजळ होण्याची समस्या देखील कमी करण्यासाठी याचा प्रभावीपाने वापर होतो. तुम्ही सुद्धा व्यायाम करत असाल तर आवर्जून हे दूध नक्की प्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT