Blue Tea Amazing Health Benefits: तुम्ही कधी निळा चहा प्यायलात का?

Blue Tea Amazing Health Benefits: ब्लू टी म्हणजे काय आहे तरी काय?
Blue Tea
Blue Tea
Published on
Updated on

भारतात पाण्यानंतर सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ म्हणजे चहा. तुम्ही हर्बल, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी अनेक प्रकारचे लोकप्रिय चहा प्यायले असतील. पण, तुम्ही कधी निळा चहा प्याला आहे का? नसल्यास, तुम्ही कधी पाहिले आहे का? या चहाबद्दल माहिती असणारे किंवा कधी पाहिलेले लोक फार कमी असतील. ब्लू बटरफ्लाय मटारच्या फुलांपासून ब्लू टी बनवला जातो. हे फक्त सुंदर दिसत नाही तर चवीलाही छान लागते. या चहामुळे तुमचा थकवा तर दूर होईलच पण त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.

ब्लू टी (Blue Tea) बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये एक कप पाणी गरम करा. पाणी थोडे कोमट झाल्यावर त्यात चार ते पाच ब्लू बटरफ्लाय पी (Butterfly Pea Flower Tea) फुले टाकून चांगले उकळा. यानंतर गॅस बंद करून त्यात मध घालून गरमागरम प्या. 

  • ब्लू टी आरोग्यदायी

  • ऊर्जा टिकून ठेवते

    निळ्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि त्याचा अप्रतिम वास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतो.

  • शरीरातील घाण निघून जाते

    ब्लू टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच आपले केस आणि त्वचा सुधारतात. तसेच शरीरातील घाण डिटॉक्स करण्याचे काम करते.

Blue Tea
Holy Month of Margashirsha: पवित्र मार्गशीर्ष महिन्यात असे ठेवा आचरण; जाणून घ्या शास्त्र काय सांगतं
  • हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम 

ब्लू टीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी देखील राखतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. मधुमेहाच्या (Diabetes ) रुग्णांसाठी ब्लू टी हा उत्तम पर्याय आहे.

  • वजन कमी होते

आपले वजन नियंत्रित करायचे आहे त्यांच्यासाठी ब्लू टी उत्तम आहे कारण त्यात असलेले कॅटेचिन वजन नियंत्रित ठेवतात. हे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याचे काम करते आणि शरीराच्या टोनमध्ये येते.

  • मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर 

काळा, हिरवा चहा सर्व प्रकारचा ताण आणि चिंता दूर करण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे, निळा चहा मानसिक विकार दूर करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे. निळ्या चहामुळे मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com