Goan Sweet Recipe
Goan Sweet Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goan Sweet Recipe: गोवन 'कुलकुल' दिसायला न्यारी पण चवीला भारी

दैनिक गोमन्तक

गोवा पर्यटनासह गोवन पदार्थांसाठी (Goan Food) देखिल प्रसिध्द आहे. खीर आणि हलव्यापासून काही वेगळे पदार्थ घरच्या घरी बनवायचे असतील तर गोव्याची खास गोड डिश कुलकुल बनवून ठेवू शकता. येता-जातांना मुलांना कुलकुल खायला आवडेल. फक्त लहान मुलांनाच कशाला, वडिलधाऱ्यांनाही त्यांची चव खूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी घरी कशी बनवायची. (Goan Sweet Recipe News)

  • 1 कप मैदा

  • 1/2 कप रवा

  • 2 चमचे तूप

  • 1/2 कप साखर

  • 1 टीस्पून मीठ

  • 2 टीस्पून कसुरी मेथी

  • तळण्यासाठी 150 ग्रॅम तेल

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • मैदा, रवा, मीठ, साखर आणि मेथी मिक्स करा. त्यानंतर त्यात तूप घालून मिक्स करा.

  • आता पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. त्यानंतर पीठ झाकून ठेवावे.

  • यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला गोल आकार द्या. प्रत्येक गोळे हलके दाबा आणि काट्याच्या मागील बाजूस चिन्हांकित करा.

  • पुढे, वरचा भाग गुंडाळा जेणेकरून तुम्हाला पुढच्या बाजूस एक गोल आकार मिळेल.

  • हे आकार बनवा आणि अर्धा तास सोडा. त्यानंतर तेल गरम करा. यानंतर हे तुकडे थोडे-थोडे मंद आचेवर तळून घ्या.

  • तळल्यानंतर हे कुलकुले टिश्यू पेपरवर काढून टाका, जेणेकरून त्यांचे अतिरिक्त तेल त्यात शोषले जाईल.

  • ते थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. मुले आणि प्रौढांना जेव्हाही भूक लागते तेव्हा ते सहजपणे खाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT