Goa Tourism: Clouds and Chorla Ghat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ढग आणि चोर्ला घाट

आकाशात पश्‍चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग कुठे जातात आणि आपल्या कुठल्या सोयऱ्यांकडे उतरतात हे जाणून घ्यायला चोर्लासारखा दुसरा घाट नाही.

दैनिक गोमन्तक

ऊस उताराला लागला आहे. वातावरणात दमटपणा फार नसला तर निळ्या आकाशातले ढगांचे पुंजले सुंदर चित्रे बनून बदलत्या आकारांनी मायावी खेळ खेळत पश्‍चिमेकडून पूर्वेकडे पांगत पांगत जाताना दिसतील. गोव्यात (Goa) उतारावरच्या प्रदेशात रगांचे विभ्रम पहायला मान उंचावून आकाशाकडे नजर लावून पहावे लागते.

Goa Tourism: Clouds and Chorla Ghat

पण ढगांचा झिम्मा अगदी नजरेसमोर सादर हाेताना पहायचे असेल तर गोव्याच्या पश्‍चिमेला असलेल्या चोर्ला घाटा इतकी योग्य जागा दुसरी नाही. पश्‍चिम घाटात वसलेल्या चोर्लाचे सौंदर्य पावसाळ्यातच खरे अनुभवयाला मिळते असे मानले जाते. ते खरेही असेल कादाचित पाऊस, झरे, हिरवी झालेली झाडे, अंगचटीला येणारे धुके हे सगळे अगदी त्या गोतावळ्यात राहून, न आवरता येणाऱ्या अपरंपार सुखाच्या मापात त्या काळात वाट्याला येते. पण जसा पाऊस उताराला लागतो घाटाला वेटाळून राहणारे तिथले ढग जरा दूर होतात. घाटातल्या डोंगदऱ्या अधिक स्पष्ट होत जातात. आता हे सौंदर्य आपण आपली वास्तवता राखून अधिक अलिप्तपणे न्याहाळू शकतो. या काळात ढग कधी डोंगरावर उतरतात आणि तिथल्या झाडांच्या दाटीत अंग सुस्तावून पडून राहतात.

Goa Tourism: Clouds and Chorla Ghat

कधी ते डोंगरांच्या पायऱ्या चढत तुमच्या दिशेने सुसाट येतात. कधी डोंगरमाथ्यावरचे हात हलक्याने सरकवून त्यांचे सुस्नात दर्शन घडवतात. कधी खोल दरीत चमकणाऱ्या पाणवठ्यावर कृष्णासम आवेगी होऊन उतरतात. ह्या चोर्ला घाटातून अनेकदा आपण हुबळी-बेळगावला किंवा कोल्हापूर-पुण्याला जातो आणि घाटावरच्या टूरिस्ट पॉईटवर उभे राहून दोन घटका डोळ्यांना सुख द्यायचा प्रयत्नही करतो पण तो घाट, तिथल्या डोंगरदऱ्या आणि त्यामधल्या ढगांचे ते मौसमी पक्षी यांचे मैत्र आणि त्यांचा मेळ यांचा अनुभव छाती भरुन घ्यायचा असेल तर त्या घाटात आपण आपला पूर्ण दिवस सारणेच श्रेयस्कर आहे. या घाटातले सौंदर्य प्रत्येक कोनातून समान परिपूर्णतेने जाणवत राहते. आकाशात पश्‍चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग कुठे जातात आणि आपल्या कुठल्या सोयऱ्यांकडे उतरतात हे जाणून घ्यायला चोर्लासारखा दुसरा घाट नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT