एक लेदर (leather) ब्रँड आहे; आजकाल लेदरच्या वस्तु (leather product) वापरण्याचा एक ट्रेंड (Trend) आहेच. परंतु लेदरच्या वस्तु फार पूर्वी पासून वापरल्या जातात; लेदर आपली ओळख ही फार पूर्वीपासून राखून आहे, आणि आजही अगदी जशीच्या तशी आहे, लेदरच्या वस्तूंच्या किमती खूप जास्त असतात, आजकाल प्यूअर लेदर खूप कमी आणि खूप महाग मिळते, तुलनेने आजकाल आर्टिफिशियल लेदर सुद्धा बाजारात उपलब्ध आहे.
लेदारची काळजी कशी घ्याल ?
1. लेदर ओले झाले असेल तर ते त्वरित सुकावा.
लेदर मधील पाणी शक्य तितक्या लवकर हळूवारपणे दाबून काढा लेदर कधीच घासू नका आणि हवेशीर ठिकाणी ठेऊन कोरडे होऊ द्या. कोरडे होण्यासाठी कोणत्याही उष्णतेचा स्त्रोत वापरू नका.
2. जर तुमचं लेदर खूपच ड्राय झालं, तर काय कराल?
लेदरसाठी उच्च दर्जाचे लेदर कंडिशनर बाजारात उपलब्ध असते; शक्यतो त्याचाच वापर करा हे कंडिशनर हलक्या हाताने लावा आणि त्या साठी स्वच्छ कापडाचा वापर करा.
3. जर तुमचे लेदर गलिच्छ झाले तर ते स्वच्छ करा.
नेहमी स्वच्छ हातांनी आपले लेदर हाताळा आपलं लेदर कोरड्या किंवा किंचित ओलसर कापडाने घासून घ्या. वर्षातून एकदा किंवा दोनदा, विशेषत: लेदरसाठी बनवलेल्या क्लीनरने आपली लेदर बॅग पुसून घ्या
4. जर तुमचा लेदर वापरला जात नसेल तर ते योग्य ठिकाणी ठेवा
लेदरची काळजी घेताना योग्य स्टोरेज महत्वाचे आहे. उष्णता, आर्द्रता, सूर्यप्रकाश आणि धूळ यापासून दूर असलेल्या जागेत लेदर ठेवा तसेच शक्यतो फॅब्रिकमध्ये लेदरच्या वस्तु ठेवा प्लास्टिकचा वापर टाळा
जेव्हा तुम्ही चामड्याची योग्य काळजी घ्याल तेव्हा ते कालांतराने अधिक सुंदर दिसेल
लेदरची किमत तुलनेने कमी असते, हे लेदर मानवनिर्मित असते, हे सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते, तुलनेने प्यूअर लेदर हे प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले असते, याची योग्य काळजी घेतल्यास हे दीर्घकाळ टिकते परंतु, थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी ते नुकसानकारक ठरू शकते. म्हणूनच प्यूअर लेदरची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. लेदरची चुकीची काळजी घेतल्यामुळे ते कोरडे होऊ शकतात, तसेच त्याचं फिनिश किंवा रंग निघून जाऊ शकतो शकतो त्याला तडे जाऊ शकतात शिवाय ते परिधान करण्यासाठी खूप कडक होऊ शकतात.
पारंपरिक चमडयाचा आधुनिक उपयोग; लेदर उत्पादनांचे काही प्रकार
लेदर चप्पल
लेदर पर्स
लेदर वॉलेट
लेदर जॅकेट
लेदर बेल्ट
वाद्ये
कपडे
जॅकेट्स
शूज
पट्टे
बांगड्या
हॅट्स
बूट
हातमोजा
चपला
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.