Goa Shipyard Recruitment 2024: Goa Shipyard Accepting Applications, Know The Last Day Of Application | | Dainik Gomantak Goa's Marathi News Channel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Shipyard Recruitment 2024: गोमंतकीय तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी, गोवा शिपयार्डमध्ये भरती सुरू

Goa Shipyard Limited (GSL) Job Opening 2024: गोमंतकीय तरूणांसाठी सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी आहे. गोवा शिपयार्डमध्ये भरती सुरू झाली आहे.

Puja Bonkile

Goa Shipyard Limited Recruitment 2024

सरकारी नोकरीसाठी गोव्यातील तरूणांसाठी एक उत्तम संधी आहे. गोवा शिपयार्ड भरती 2024 सुरू झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड सल्लागार (तांत्रिक) Consultant( Technical) पदासाठी पात्र आणि स्वीकार्य पदासाठी भरती सुरू केली आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारिख 13 मार्च 2024

अर्ज ऑनलाइन देखील करू शकता

गोवा शिपयार्ड भर्तीसाठी पद आणि रिक्त जागा

सल्लागार (तांत्रिक) Consultant( Technical) पद- रिक्त जागा 1

आवश्यक शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून यांत्रिक/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पूर्णवेळ नियमित बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (BE) / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B. Tech.) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी उमेदवाराचे वय 63 वर्ष पुर्ण असावे.

गोवा शिपयार्ड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, नमूद केलेल्या पदासाठी 01 जागा उपलब्ध आहेत. निवडलेल्या अर्जदारांना प्रति महिना रु.110000 पगार देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असणार आहे.

गोवा शिपयार्ड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेवर आधारित, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच 15 मार्च 2024 पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह त्याच रीतसर भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट देऊ शकतात.

अर्ज कसा करावा

गोवा शिपयार्ड भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच त्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर वय, अनुभव आणि पात्रतेच्या समर्थनार्थ सर्व कागदपत्रांसह, त्याच पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट देखील पाठवू शकतात.

पत्ता

विभाग प्रमुख (HR&A), डॉ. बी.आर. आंबेडकर भवन, गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को-द-गामा, गोवा – 403802

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT