Ashutosh Masgaunde
सध्या बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा काही नोकऱ्या आहे, ज्यांची अनेक कंपन्यांना गरज आहे. यासह फ्रेशर्सही याच नोकऱ्यांना प्रधान्य देत आहेत.
टेक सेक्टरमध्ये, सतत होणाऱ्या बदलांमुळे कोडींग, UI/UX, आणि डेटा विश्लेषणासारख्या अद्ययावत कौशल्यांमध्ये निपुण फ्रेशर्सची आवश्यकता भासत आहे.
जपळपास प्रत्येक कंपनी आज मौल्यवान कौशल्ये असणारे फ्रेशर्स शोधत आहे. कारण अनुभवी व्यावसायिकांच्या तुलनेत फ्रेशर्स कमी पगारात कामास तयार होतात.
या नोकरीला मोठी मागणी आहे. कारण आज बाजारात रोज नवे नवे एप्स येत आहे. आणि क्लायंटच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्पादन योग्य आहे की नाही याची खात्री टेस्टर करतात.
एसइओ एक्सेक्युटीव्ह लिंक-बिल्डिंगसह ऑन आणि ऑफ-पेज ऑप्टिमायझेशन करून वेबसाइटची व्हिसिबिलिटी सुधारण्याचे काम करतात. ते मुख्य मेट्रिक्सचा मागोवा घेण्यासाठी एसइओ टूल्स आणि एनालिटिक्स प्लॅटफॉर्म (जसे की Google Analytics) वापरतात, ज्यामुळे वेबसाइट सुधारण्यासाठी मदत होते.
एक जॅक-ऑफ-ऑल डेव्हलपर किंवा अभियंता जो वेबसाइटचा पुढचा भाग (जो यूजर्सना दिसतो) आणि बॅकएंड (जेथे वेबसाइट संबंधित काम चालते) दोन्ही तयार करू शकतो.
यूजर इंटरफेस आणि यूजर एक्सपेरियन्स डेव्हलपर म्हणून, वेबसाइट्स आणि वेब एप्लिकेशन्सवर परस्परसंवादी आणि व्हिज्युअल डिझाइन तत्त्वे लागू करून सकारात्मक आणि एकसंध यूजर एक्सपेरियन्स देण्याचे काम UI/UX Developer कडे असते.
प्रत्येक क्षेत्रातील संस्था, कंपन्यांना त्यांच्या मूल्यमापनासाठी आणि त्यांच्या कार्यप्रदर्शनाच्या ऑप्टिमायझेशनसाठी डेटाची आवश्यकता असते. हे डेटा इंजीनिअर कच्चा डेटा एकत्र करून कंपन्यांना त्यांच्या उपयोगाला येईल असा पक्का डेटा उपलब्ध करून देतात.