Animals Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लॉकडाऊनच्या काळात मुक्या जिवांसाठी 'या' झाल्या अन्नपुर्णा

लॉकडाऊनच्या काळात सारे काही बंद झाल्यामुळे रस्त्यावर असलेल्या बेवारस मुक्या जनावरांच्या पोटाचे हाल सुरू झाले होते.

दैनिक गोमन्तक

चार दिवसांपूर्वीच दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण केंद्रावरून प्रचीता शेटगावकर आणि अक्षता सिंग यांच्या, त्या करत असलेल्या सेवाभावी कामाची नोंद घेतली गेली. प्रचीता शेटगांवकर आणि अक्षता सिंग यांच्या या कामाची सुरुवात पहिल्या लॉकडाऊनच्या काळात झाली. लॉकडाऊनच्या काळात सारे काही बंद झाल्यामुळे रस्त्यावर असलेल्या बेवारस मुक्या जनावरांच्या पोटाचे हाल सुरू झाले होते. एरवी हॉटेल, बाजार वगैरे ठिकाणी आपली गुजराण करणाऱ्या कुत्र्यांना खायला मिळणे मुश्किल झाले होते. तेव्हा प्रचिता आणि अक्षता यांनी पुढाकार घेऊन त्यांना अन्न घालायला सुरुवात केली.

त्या काळात रोज जवळजवळ तीनशे कुत्र्यांना त्या खायला घालत होत्या. केवळ या कुत्र्यांना खायला घालणे इतक्यापुरते त्यांचे काम नंतर मर्यादित राहिले नाही. जखमी जनावरांची, कुत्र्यांची शुश्रूषा करणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे ही कामेदेखील चालू झाली. नंतर त्यांनी ‘सोसायटी फॉर वेल्फेअर ऑफ ॲनिमल अॅण्ड नेचर’ (स्वान) हा ग्रुप बनवला. डिचोली, साखळी, मये वगैरे भागातील प्राणिप्रेमी मित्र या ग्रुपमध्ये सामील झाले आहेत.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली अक्षता, प्रसिद्ध सर्पमित्र अमृत सिंग यांची मुलगी आहे. लहानपणापासून ती आपल्या वडिलांबरोबर निसर्गरक्षणाच्या कामात गुंतली आहे. तिने वैयक्तिकपणे आतापर्यंत हजारांवर सापांना जीवदान दिले आहे. प्रचीता शेटगावकर ही मानसशास्त्र विषयात आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम करत आहे. तिला देखील लहानपणापासून प्राण्यांचा लळा होताच. घरातल्या कुत्र्या-मांजरांशी मैत्र होतेच. आता हे मैत्र ‘जीवांचे’ बनले आहे. ती देखील सापांना जीवदान देण्यात कुशल बनली आहे.

तिनेही आतापर्यंत किमान दोनशे सापांना जीवदान दिले आहे.प्रचीताने हल्लीच घडलेला एक विलक्षण प्रसंग सांगितला. वेळ साधारण रात्री नऊची होती. प्रचिती आणि आकांक्षा नेहमीप्रमाणे रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. इतक्यात कडेला असलेल्या गल्लीतून कुणीतरी पुरुषी वृत्तीने या मुलींना पाहून आपले उपद्रवी डोके वर काढलेच. मात्र तिथे असलेल्या साऱ्या कुत्र्यांना या अभद्रतेची जाणीव झाली आणि त्यांनी त्या पुरुषी मदांधतेच्या दिशेने आक्रमकतेने भुंकायला सुरुवात केली. ज्यांच्या जगण्यासाठी प्रचीता आणि आकांक्षा गेले वर्षभर आपल्या सेवावृत्तीने राबत होत्या, त्या रस्त्यावरच्या बेवारस कुत्र्यांनी त्या दोघींच्याप्रति आपला मैत्रभाव आणि इमान असे जपले.

आता गावातील लोकही, त्यांच्या या कामातली तळमळ आणि त्यातील मानवतावादी बाजू पाहून त्यांना मदत करायला पुढे सरसावले आहेत. धान्याच्या रूपाने, पैशाच्या स्वरूपात ते त्यांना मदत करत असतात. एखाद्या जनावराचा आजार जर त्यांच्या औषधोपचाराच्या पलीकडे गेला असला तर आसगाव येथील वॅटरीनरी मदत त्या दोघी घेतात. त्याशिवाय डिचोली शहरात असलेल्या सरकारी इस्पितळातील डॉक्टर केणी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनही त्यांना मिळते. प्रचीता आणि अक्षता यांना डिचोली शहरातले बहुतेक कुत्रे आता ओळखतात. प्रचीताची आई हल्लीच गाडी घेऊन बाजारात गेली होती तेव्हा प्रचीताच्या गाडीला ओळखून तिथले सारे कुत्रे तिच्या आईच्या भोवती जमले. ‘ममता’ आपली माणसे अशी ओळखते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT