Glowing Skin
Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Glowing Skinसाठी फुलांपासून बनवा परफेक्ट फेस पॅक

Puja Bonkile

Flower Face Pack for Glowing Skin: ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही अनेक उपाय करता. महागडे प्रोडक्ट वापरता पण रिझल्ट दिसत नाही. पण जेव्हा तुमची स्किन चांगली आणि हेल्दी असेल तर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स असतो.

पण आज आम्ही तुम्हाला सिंपल फंडा सांगणार आहोत ज्यामुळे चेहऱ्यावर लगेच चमक येणार. फुलांपासून बनवलेला फेस पॅक वापरु शकता. चला तर जाणून घेऊया फुलांपासून घरच्या घरी फेस पॅक कसे बनवावे.

  • जास्वंदाचे फुल

जास्वंदाचे फुल गणपतीला अर्पण केले जाते. पण या फुलांचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठी केला जातो. हा पॅक बनवण्यासाठी जास्वंदाचे फूल, गुलाब, दही आणि मुलतानी माती एकत्र करून पेस्ट तयार करा. नंतर चेहऱ्यावर लावावा. 5 मिनिटांनंतर चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करावी आणि स्वच्छ पाण्याने धुवावे.

  • लॅव्हेंडर

लॅव्हेंडरच्या फुलाचा रंग प्रत्येकाला आकर्षित करतो. या फुलांच्या पाकळ्यांमध्ये ओट्स मिक्स करून ते वापरता येते. यासाठी पाकळ्या उकळून घ्या आणि ब्लेंड करून घ्या. आता त्यात ओट्स टाकून ते सुद्धा ब्लेंड करून घ्या. हे तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही वेळाने पाण्याने धुवून घ्या.

rose water
  • झेंडूचे फुल

घराची सजावट असो वा कोणती पूजा असो सगळ्यात नेहमी उपयोगी पडणाऱ्या झेंडूच्या फुलांपासून तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता. हे बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, आवळा पावडर, दही आणि लिंबूचा रस घेऊन मिक्स करावे. त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी. साधारण 15 ते 20 मिनीटांनंतर चेहरा पाण्याने धुवावे.

  • गुलाबाचे फुल

तुम्ही गुलाबापासून बनवलेल्या गुलाब जलाचा वापर करत असालच. तसेच तुम्ही फेसपॅक देखील बनवु शकता. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या, चंदन पावडर आणि दूध घ्यावे. सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या काही वेळ पाण्यात उकळून घ्या.

असे केल्याने ते बारीक करणे सोपे जाते. गुलाबाच्या पाकळ्या ब्लेंड केल्यानंतर त्यात चंदन पावडर आणि दुध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावावी. काही वेळाने हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवावे.

  • चमेलीचे फुल

या फुलांचा सुंगध सर्वांना खुप आवडतो. चमेलीच्या फुलांचा वापर करुन तुम्ही फेसपॅक बनवु शकता. हा फेसपॅक बनवण्यासाठी फुलांच्या पाकळ्या नीट बारिक कराव्या. नंतर त्यात दही आणि साखर मिक्स करावे. ही पेस्ट संपुर्ण चेहऱ्यावर लावावे आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT