Benefits of Sukhasana Position: 'या' पद्धतीने जेवण केल्यास मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

आपल्या देशात जेवण हे जमिनीवर बसून करण्याची पद्धत आहे. यामुळे अनेक समस्या दुर राहतात.
Benefits of Sukhasana Position
Benefits of Sukhasana PositionDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Sukhasana Position: धावत्या जीवनशैलीमुळे सगळ्या गोष्टी झटपट करण्याची सवय झाली आहे. माणसे फक्त धावतांना दिसतात. आपलं दैनंदिन राहणीमान, उठणं आणि बसणं असो किंवा खाणं-पिणं असो प्रत्येक गोष्टीत वेगानं बदल होत आहेत. हा सर्व बदल टीव्ही, चित्रपट आणि सोशल मीडियामुळेही झाला आहे.

सध्या आधुनिकीकरणामुळे खुर्ची आणि टेबलवर बसून जेवण करायचा ट्रेंड आहे. अनेकांना वेळ नसल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे उभं राहून आणि चालत-चालत जेवण करतांना तुम्ही पाहिले असेलच. परंतु, जेवण करायची सर्वांत योग्य पद्धत कोणती आहे हे अनेक लोकांना माहितीच नसते.

आपल्या देशात अनेक वर्षापासून सुखासन किंवा  पद्मासन अशा आसनात बसून जेवण केले जाते. ही सर्वात चांगली पद्धत समजली जाते. या सुखासन पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

  • अपचनाची समस्या होते दुर

अनेक लोकांना बेडवर किंवा सोफ्यावर बसून जेवण करण्याची सवय असते.पण ही पद्धत चुकीचा आहे. जेवण करतांना नेहमी खाली जमिनीवर बसून करावे. यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते. तसेच पोटासंबंधित समस्या दुर होतात.

  • मन शांत राहते  

सुखासन आणि पद्मासन घालुन बसल्यामुळे मन शांत होते. अशा पद्धतीने बसल्यामुळे तणाव दूर होतो आणि आरामदायी वाटतं. म्हणून नेहमी जमिनीवर बसून जेवण करावे. यामुळे अनेक आरोग्यदास फायदे होतात. शांतचित्ताने जेवण केल्यामुळे चांगल्या पद्धतीने पचन होते. त्यामुळे जेवण करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी.

  • लवचिकपणा वाढतो

सुखासन पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे शरीराचा लवचिकपणा वाढतो. यामुळे पाय आणि स्नायूचा व्यायम होतो. तसेच तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करण्यास प्राधान्य द्यावे.

Benefits of Sukhasana Position
Homeopathic Medicines: होमिओपॅथी औषधं खरंच उशीरा परिणाम करतात का? जाणून घ्या तज्ञांचे मत
  • पाठ दुखीची समस्या

जमिनीवर बसून जेवण केल्यामुळे शरीराच्या बसण्याच्या पद्धतीत सुधारणा होते. या पद्धतीने बसल्यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो आणि पाठ दुखीच्या समस्येपासूनही सुटका मिळते. 

  • ब्लड सर्क्युलेशन

सुखासन आसन पद्धतीत बसून जेवण करताना आपण क्रॉस लेग स्थितीत असतो. यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगले होते आणि तुमच्या स्नायूंवर दाब पडून आराम मिळतो. पचनसंस्था सृदृढ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच खाली बसून जेवण केल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com