Ginger Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ginger Benefits: रिकाम्या पोटी आलं खाल्यास मासिक पाळीतील वेदना होतील दूर

ज्या मुलींना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात त्यांनी हा उपाय करून पाहावा

Puja Bonkile

भारतीय जेवणात आलं-लसूण मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण तुम्हाला माहिती आहा का रिकाम्या पोटी रिकाम्या पोटी आलं खाणे फायदेशीर असते. खास म्हणजे ज्या लोकांना मासिक पाळी दरम्यान खुप वेदना होतात त्यांनी आल्याच सेवन करावे. आल खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. मध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे मानवी शरीरासाठी खूप चांगले असतात.

  • मासिक पाळीत फायदेशीर

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराच्या दुखण्यावर आराम मिळतो. रिकाम्या पोटी आलं खाल्ल्याने शरीर आणि स्नायूंचा ताण कमी होतो. विशेषत: पिरियड्सच्या वेदना काही प्रमाणात आल्याचे सेवन केल्याने कमी होतात.

तसेच स्ट्रेचिंग आणि जळजळ कमी होते. मासिक पाळीच्या काळात तुम्हाला या खास पद्धतीने खावे लागेल. एक आलं घ्यावे आणि ते गरम केल्यानंतर ते चावावे. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

  • आलं हृदयासाठीही फायदेशीर

आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे रक्त गोठणे, रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयविकारातही हे खूप फायदेशीर आहे. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आल्याचा रस रिकाम्या पोटी प्यावा किंवा आल्याचे सेवन करावे. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

  • रिकाम्या पोटी आले खाल्ल्याने त्वचेसाठी फायदेशीर

जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर रोज कोमट पाण्यासोबत आल्याचे सेवन करावे. यामुळे तुमची त्वचा डागांपासून मुक्त राहील. तसंच तुमची त्वचा चमकदार होईल.

  • सांधेदुखीची समस्या दूर होते

आल्यामध्ये दाहक आणि वेदनाशामक घटक असतात. जे तुमच्या शरीरातील सूज आणि वेदना कमी करते. या गुणधर्मांमुळे सांधेदुखीच्या रुग्णांना रिकाम्या पोटी आले खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की संधिवाताच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी आले किंवा त्याचे पाणी प्यायल्यास त्यांना वेदनांपासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT