Morning Tips For Pregnant Women: गरोदरपणात सकाळी रिकाम्या पोटी 'या' पदार्थांचे करावे सेवन, दिवसभर राहाल एनर्जेटिक

गरोदरपणात आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे बाळ आणि आई दोन्हींचे आरोग्य चांगले राहते.
Morning Tips For Pregnant Women
Morning Tips For Pregnant WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Morning Tips: आई होणे ही प्रत्येक महिलेसाठी खास असते. असा वेळा आहाराची काळजी घेणे गरजेचे असते. कारण तुम्ही जे खाता ते थेट तुमच्या बाळावर परिणाम होतो. म्हणून डॉक्टर या संपूर्ण 9 महिन्यात हेल्दी आहार घेण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो. पण सकाळी रिकाम्या पोटी गरोदर महिलांनी काय खावे हे जाणून घेऊया.

  • कोणत्या प्रकारचा आहार घेणे चांगले?

गर्भवती महिलांना सकाळी रिकाम्या पोटी असे काहीही खाऊ नका जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी हानिकारक आहे. गरोदरपणा दरम्यान तुमच्या आहारात फक्त आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा.

अशावेळी सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की या काळात काय खावे, जे आई आणि मूल दोघांसाठीही चांगले आहे. गर्भवती महिलांनी सकाळी हेल्दी आणि हलके अन्न खावे जेणेकरुन त्यांना अॅसिडीटी आणि गॅसची समस्या होणार नाही. इतकंच नाही तर बद्धकोष्ठतेची समस्याही हे टाळू शकतात आणि त्या दिवसभर उत्साही असेल.

  • गरोदरपणात सकाळी रिकाम्या पोटी काय खावे?

सकाळी रिकाम्या पोटी जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि लोह, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असलेले पोषक पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करावे. हे पोषक तत्व आई आणि बाळ दोघांसाठी खूप चांगले आहे. सकाळी आंबट फळं खाणे टाळावे. उदाहरणार्थ, संत्रा, किवी, द्राक्षे, आवळा ही फळे.

Morning Tips For Pregnant Women
Shravan Special: शिवलिंगाची पुजा करताना काय करावे अन् काय करू नये, वाचा एका क्लिकवर
  • कडधान्य

कड धान्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर असतात. दलिया, ओट्स आणि ब्राऊन ब्रेडचे सेवन करावे म्हणून त्यात भरपूर फायबर असते.

  • पोहे

सकाळचा नाश्ता हलका असावा. यामुळे नाश्त्यासाठी पोहे खाणे चांगले असतात. गरोदरपणात रिकाम्या पोटी पोहे आणि उपमा खाणे चांगले मानले जाते. तसेच त्यात भरपूर पोषक असतात. पोहे हेल्दी बनवण्यासाठी त्यात बीन्स आणि शेंगदाणेही टाकता येतात.

  • अंडी

जर तुम्हाला अंड्यांपासून कोणतीही ऍलर्जी किंवा दुर्गंधीची समस्या नसेल तर तुम्ही गर्भधारणेदरम्यान रिकाम्या पोटी आरामात अंडी खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com