Ginger Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ginger Health Effects: आले बहुगुणीच मात्र अतिसेवनाचे आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम!

Ginger Health Effects: त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे यासारखा त्रास होण्यास सुरुवात होते.

दैनिक गोमन्तक

Ginger Health Effects: आपल्या प्रत्येकाच्या घरी भाज्यांना खास चव येण्यासाठी आपण आल्याचा वापर कित्येक वेळा करत असतो. याबरोबरच, अनेकांना आल्याचा चहा आवडतो. आपल्यापैकी अनेकजण खोकल्यावर औषध म्हणून आल्याचा काढ्यात वापर केला जातो.

आले असे बहुगुणी आणि बहुउपयोगी असले तरी त्याचा अतिरेक आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकतो. तज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार आल्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. चला तर जाणून घेऊयात आल्याचे आपल्या आरोग्यासाठी तोटे काय आहेत.

1. कमी रक्तदाब ( Low Blood Pressure )

जे लोक जास्त प्रमाणात आल्याचे सेवन करतात त्यांना कमी रक्तदाबा( Blood Pressure )चा त्रास होऊ शकतो. यामुळे व्यक्ती अशक्त होते आणि त्यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते.

2. अॅलर्जी

अनेकांना आले खाल्यानंतर शारिरिक त्रास जाणवू लागतो. त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे यासारखा त्रास होण्यास सुरुवात होते.

3. रक्त पातळ होणे

आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

४. छातीत जळजळ

आल्यामध्ये मसालेदार गुणधर्म आढळतात, म्हणूनच जर ते मर्यादेपेक्षा जास्त खाल्ले तर छातीत जळजळ किंवा अॅसिड रिफ्लक्सची तक्रार होऊ शकते. त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी आले खाताना विचार केला पाहिजे.

5. पोटाच्या समस्या

आल्याच्या अतिसेवनामुळे छातीत जळजळ, गॅस आणि डायरिया यासह पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आल्या वापर करताना विचार केला पाहिजे.

आल्याचा उपयोग सर्दी खोकल्यावर, हृदयाशी संबंधित आजारात आले उपयुक्त पडू शकते.

त्यामुळे आले सर्दी-खोकल्यासारख्या आजारां( Disease ) मध्ये उपयुक्त ठरत असले तरीही आल्याचे अतिसेवन अनेकदा हानीकारक ठरु शकते. याबरोबरच, तुम्ही कोणत्या आजाराचा सामना करत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT