Ginger Dainik Gomantak
लाइफस्टाइल

​Ginger Cultivation: घरच्या घरीच उगवा आलं; फक्त करावे लागेल हे काम

​Ginger Cultivation: औषधी गुणधर्मांनी परिपुर्ण असलेले आलं तुम्ही घरीच उगवू शकता.

दैनिक गोमन्तक

Ginger Cultivation At Home: आलं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषत: हिवाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी अनेक लोक आल्याचा वापर करतात. तुम्ही घरच्या घरीच आलं उगवू शकता.

आलं शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते. आल्यामध्ये असलेले कॅल्शियम, झिंक, लोह आणि जीवनसत्त्वे अनेक आजारांना दूर ठेवते.

हिवाळ्यात चहामध्ये आलं घातल्याने त्याची चव तर वाढतेच आणि सर्दी-खोकल्यापासूनही तुमचे संरक्षण होते.

घरी आल्याची लागवड केल्यानंतर तुम्हाला बाजारातून आणण्याची गरज पडणार नाही. यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल. तुम्ही घरी पडलेल्या कोणत्याही रिकाम्या बॉटलमध्ये किंवा भाड्यांमध्ये आलं उगवू शकता. 

आल्याची लागवड करण्यासाठी सर्वात पहिले एक रिकामी बॉटल घ्यावी. यानंतर, थेट सूर्यप्रकाश असेल अशी जागा निवडावी. बाल्कनी, टेरेस, बागेत किंवा घराच्या खिडकीजवळही आलं ठेवू शकता. 

आलं उगवण्यासाठी कोको पीट, वर्मी कंपोस्ट आणि शेणखत यांचे मिश्रण माती रिकाम्या डब्यात टाकावे. लक्षात ठेवा की माती जास्त चिकट किंवा ओली नसावी. भांडे तयार केल्यानंतर, 2 ते 3 इंचाचा आल्याचा तुकडा भांड्यात ठेवावा आणि त्यावर माती घालावी आणि नंतर पाणी घालावे.

आल्याचे रोप तयार केल्यानंतर, ते एक सुर्यप्रकाश मिळे अशा ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्याची वाढ लवकर होईल.

यानंतर, आपण वेळोवेळी लक्ष द्यावे की रोप कोणत्याही रोग किंवा कीटकांना बळी पडणार नाही. एका महिन्याच्या आत तुम्हाला आल्याचे रोप तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT